ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दापोली: माटवण येथे म्हशी चरायला घेऊन गेलेल्या गुराख्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दापोली: माटवण येथे म्हशी चरायला घेऊन गेलेल्या गुराख्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
दापोली

दापोली: माटवण येथे म्हशी चरायला घेऊन गेलेल्या गुराख्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
Last updated: November 2, 2026 12:48 pm
Gramin Varta
89 Views
Share

दापोली: म्हशी चरायला घेऊन गेलेल्या एका गुराख्याचा माटवण परिसरातील पाणवठ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हरि विठ्ठल काते (मुळ रा. पालगड गवळवाडी, सध्या रा. माटवण, ता. दापोली) असे मयत गुराख्याचे नाव असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरि काते हे दरवर्षी जुलै ते डिसेंबर या कालावधीत माटवण येथे म्हशी पाळणे व चारण्याचे काम करत होते. त्यांच्या नित्यनेमानुसार ते दररोज सकाळी आठ वाजता म्हशी चरण्यासाठी नेत असत व दुपारी बाराच्या सुमारास परत आणत. त्यानंतर पुन्हा दुपारी साडेतीन वाजता म्हशी घेऊन जाऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत परत येत असत. नेहमीप्रमाणे ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते म्हशी चरण्यासाठी माटवण रस्त्यालगत असलेल्या जंगलात घेऊन गेले होते. मात्र, सायंकाळी सहा वाजले तरी ते परत न आल्याने म्हशींच्या मालकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

शोध घेत असताना जंगलात म्हशी चरताना आढळून आल्या, परंतु गुराखी हरि काते यांचा कुठेही पत्ता लागला नाही. मोठ्याने हाका मारूनही त्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर म्हशींना वाड्यात आणून बांधण्यात आले. त्यानंतर ते माटवण येथील आपल्या घरी गेले असतील या शक्यतेने कुटुंबीयांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली, मात्र ते तिथेही पोहोचले नव्हते. अखेर म्हशी पाणी पिण्यासाठी ज्या ठिकाणी जातात, त्या काटलीचा पऱ्या या पाणवठ्याच्या दिशेने शोधमोहीम सुरू करण्यात आली.

रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काटलीचा पऱ्या येथील पाण्यात हरि काते हे उपड्या अवस्थेत निपचित पडलेले आढळून आले. त्यांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस ठाण्यात १ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5468524
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कांद्याच्या साली फेकू नका! कुंडीतील झाडांसाठी ठरतात नैसर्गिक खत; वापरण्याच्या चार सोप्या पद्धती

Gramin Varta
3 Min Read

पावस येथील ‘कामावर जातो’ सांगून निघालेला २८ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी : उज्ज्वला भिडे स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत सोहम रुमडे विजेता

Gramin Varta
2 Min Read

गुहागर : वेळणेश्वर येथे अभियांत्रिकीच्या २० वर्षीय विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

दापोली

रत्नागिरी : निरूळ येथील जंगलात आढळला गळफास घेतलेला अनोळखी तरुणाचा मृतदेह

1 Min Read
दापोली

किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त २२ वर्षीय तरुणीचा दापोलीत उपचारादरम्यान मृत्यू

2 Min Read
दापोली

दापोलीतील बीएसएनएल कार्यालय फोडून ७ हजारांची डीसी केबलची चोरी

1 Min Read
दापोली

दाभोळ एसटी स्थानकाजवळ संशयास्पदरीत्या वावरणारा तरुण ताब्यात

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?