ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा आणि प्राप्त सूचनांचा सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार – अपर मुख्य सचिव व्ही. राधा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा आणि प्राप्त सूचनांचा सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार – अपर मुख्य सचिव व्ही. राधा
महाराष्ट्र

परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा आणि प्राप्त सूचनांचा सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार – अपर मुख्य सचिव व्ही. राधा

Gramin Varta
Last updated: September 30, 2026 8:26 am
Gramin Varta
10 Views
Share

भरती परीक्षा सुधारण्यासाठी सुमारे ३० हजार सूचनांचे ईमेल प्राप्त

मुंबई:- भरती परीक्षा प्रक्रिया सुधारणा हा विषय राज्य शासनाने अतिशय गांभीर्याने घेतला आहे. हा विषय अतिशय संवेदनशील असल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांनी मांडलेल्या सूचनांचा टास्क फोर्सकडून सकारात्मक विचार केला जाईल, तसेच परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर केला जाईल, असे भरती परीक्षा सुधारणासाठी गठित टास्क फोर्सच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भरती परीक्षा प्रक्रिया अधिक प्रभावी, आदर्श करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भरती परीक्षा सुधारण्यासाठी गठित उच्चस्तरीय समितीने कोकण विभागातील उमेदवारांशी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधला. यावेळी उच्चस्तरीय समितीचे सदस्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, समितीचे सदस्य तथा संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त), सदस्य तथा भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रा. श्यामप्रसाद करगड्डे, यांच्यासह कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते.

अपर मुख्य सचिव व्ही. राधा म्हणाल्या, उच्च स्तरीय टास्क फोर्सकडून आतापर्यंत पुणे, नागपूर, अमरावती , छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी व उमेदवारांशी संवाद साधण्यात आला आहे. कोकण विभागातील संवादानंतर आज (बुधवार) नाशिक विभागात टास्क फोर्स संवाद साधणार आहे. प्रत्येक विभागात वेगळे प्रश्न मांडण्यात आले. प्रत्येक प्रश्न, मुद्याचा सखोल अभ्यास करूनच अहवाल शासनास सादर केला जाईल.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने हा टास्क फोर्स गठित केला असून आतापर्यंत सुमारे १५०० विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला असून भरती परीक्षा सुधारण्यासाठी सुमारे ३० हजार सूचनांचे ईमेल प्राप्त झाले असल्याचे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

व्ही. राधा म्हणाल्या, एक अधिकारी म्हणून माझ्यासाठीही हा अनुभव अत्यंत शिकवणारा ठरला आहे. प्रत्येक विभागात काही नवीन प्रश्न समोर आले. कोकण विभागातही काही वेगळे मुद्दे निदर्शनास आले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेतून टास्क फोर्सला मोठ्या प्रमाणात माहिती आणि अनुभव मिळाला आहे. प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी वेगळी आहे आणि त्यांचे प्रश्नही वेगवेगळे आहेत. संवादातूनही विविध प्रकारचे प्रश्न समोर आले असून अहवाल तयार करताना याचा निश्चितच उपयोग होणार आहे.

व्ही. राधा म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी विविध विभागांच्या परीक्षांशी संबंधित स्वतंत्र समस्याही मांडल्या आहेत. त्यामुळे परीक्षानिहाय आणि विभागनिहाय प्रश्नांचा अभ्यास करण्यात येणार आहे. यासोबतच संघ लोकसेवा आयोग, इतर राज्यांतील भरती प्रक्रियेचाही अभ्यास केला जाणार आहे. संबंधित विभागांच्या सचिवांशी चर्चा करून समस्यांच्या मुळ कारणांचा शोध घेतला जाईल. केवळ शिफारसी करण्याऐवजी प्रत्यक्ष अडचणी दूर करण्यावर टास्क फोर्सचा भर राहणार आहे. विद्यार्थ्यांकडून आलेल्या सूचना आणि संवादातून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे भरती परीक्षा प्रक्रिया अधिक प्रभावी, आदर्श करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी टास्क फोर्सचे सदस्य वीरेंद्र सिंह, एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त), प्रा. श्यामप्रसाद करगड्डे यांनीही आपले विचार मांडले.

कोकण विभागातील संवाद प्रसंगी भरती परीक्षा प्रक्रियेतील दिरंगाई टाळावी, आयोगाकडून विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, परीक्षा पारदर्शक व्हावी, परीक्षा पॅटर्न बदलाबाबत पूर्व कल्पना मिळावी, गट क ची सर्व पदांची भरती एकत्र व्हावी, दोन पदांच्या परीक्षेत अंतर असावे, प्रलंबित परीक्षा लवकर व्हाव्यात, पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा असे दोन भाग असावेत, वरिष्ठ पदानुसार निकाल जाहीर केला जावा, एक पद एक परीक्षा असावी, प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांचा विचार व्हावा, वर्णनात्मक प्रश्नपत्रिका असावी, एकदाच नोंदणी व शुल्क आकारणी करावी, प्रश्नपत्रिकेचा दर्जा, उत्तरतालिका आणि पेपर तपासणी अधिक पारदर्शक असावी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलींना वयामध्ये सूट असावी, अशा विविध सूचना करण्यात आल्या.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापूर रॉयल चेस ऍकॅडमीच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेला प्रतिसाद

Gramin Varta
2 Min Read

अभिषेक शर्मा टी-२० सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना सप्टेंबरचा पगार आजच; बँक संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर साडेतीन वर्षांत ५७२ जणांचा मृत्यू !

2 Min Read
महाराष्ट्र

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रला नवी बळकटी; राज्य कौशल्य विकास सोसायटी-सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

3 Min Read
महाराष्ट्र

डावखरे मानहानी खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची निर्दोष मुक्तता

2 Min Read
महाराष्ट्र

‘दुःखी कसं राहायचं?’ केतनच्या मृत्यूनंतर सियाचा ChatGPTला सवाल; चार्जशीटमधील उल्लेखाने खळबळ

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?