ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रोजगार महाकुंभ महाराष्ट्रला नवी बळकटी; राज्य कौशल्य विकास सोसायटी-सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रोजगार महाकुंभ महाराष्ट्रला नवी बळकटी; राज्य कौशल्य विकास सोसायटी-सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार
महाराष्ट्र

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रला नवी बळकटी; राज्य कौशल्य विकास सोसायटी-सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 8:05 am
Gramin Varta
8 Views
Share

युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी;शासन-उद्योग-सामाजिक संस्थांचा समन्वित पुढाकार

मुंबई: राज्यातील युवकांना त्यांच्या जिल्हा, तालुका आणि स्थानिक परिसरात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला नवी बळकटी मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि सृजन ट्रस्ट, पुणे यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

येत्या २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार महाकुंभाची व्याप्ती वाढविणे, विविध उद्योग व आस्थापनांचा सहभाग वाढविणे आणि जास्तीत जास्त रोजगार इच्छुक युवकांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे.

या उपक्रमांतर्गत राज्यभर विविध ठिकाणी रोजगार मेळावे आणि प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येणार असून, रोजगार इच्छुक युवक आणि नोकरी देणाऱ्या कंपन्यांना एकाच व्यासपीठावर आणले जाणार आहे. मेळाव्यांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली जाणार असून, शक्य तेथे निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर किंवा नियुक्तीपत्र देण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

विविध उद्योग, कंपन्या, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप्स तसेच सेवा क्षेत्रातील संस्थांना या उपक्रमाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. उपलब्ध रिक्त पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्य, अनुभव, कामाचे ठिकाण आणि अपेक्षित भरतीची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटीआय व कौशल्य प्रशिक्षणार्थी, पदवीधर, पदविकाधारक तसेच इतर रोजगार इच्छुक युवकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचविण्यासाठी शैक्षणिक संस्था, युवा संघटना आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. महिला, दिव्यांग, ग्रामीण युवक आणि रोजगाराच्या संधींपासून वंचित घटकांच्या सहभागावर विशेष भर देण्यात येणार आहे.

रोजगार मेळाव्यांच्या प्रभावी आयोजनासाठी उमेदवार नोंदणी, कंपन्यांसाठी हेल्प डेस्क, मुलाखत व्यवस्था, गर्दी व्यवस्थापन आणि स्वयंसेवकांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच, निवड झालेल्या उमेदवारांच्या जॉईनिंग स्टेटसचा पाठपुरावा करून या उपक्रमातून प्रत्यक्ष किती युवकांना रोजगार मिळाला, याचे परिणामाधारित मूल्यमापनही करण्यात येणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या अपर सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त अमित सैनी, सृजन ट्रस्टचे विश्वस्त प्रा. मिलिंद मराठे, दिपक मुकादम, प्रा. वैद्य कैलास सोनमनकर, विशेष कार्य अधिकारी पंकज पाठक, अमित पटले, श्रेयस जोगळेकर, अलका यादव आदींच्या उपस्थितीत करार झाला.

राज्यातील लाखो युवकांसाठी सुवर्णसंधी!

राज्यातील युवकांना केवळ रोजगाराची माहिती नव्हे, तर प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’च्या माध्यमातून युवक, उद्योग आणि उद्योग व आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणले जात आहे. शासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वित प्रयत्नातून हा उपक्रम राज्यातील लाखो युवकांसाठी नवी संधी निर्माण करेल.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात समाजसेवा मंडळाचा स्वच्छता उपक्रम; ३३ सेवेकऱ्यांचे श्रमदान

Gramin Varta
1 Min Read

Key Narratives on the Ongoing Evolution of Digital Landscapes

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

अभिषेक शर्मा टी-२० सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

देवदर्शनानंतर मुंबईला परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात;चौघांचा जागीच मृत्यू, सात जखमी

2 Min Read
महाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी दिलासा; ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता २४ सप्टेंबरनंतर बँक खात्यात जमा होण्याची शक्यता

2 Min Read
महाराष्ट्र

पोलिसांच्या सीसीटीव्ही खांबात वीजप्रवाह उतरल्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल

2 Min Read
महाराष्ट्र

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबवणार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?