ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: वहाळ जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांनी वेळेत करावी खरीप पिकांची ई-पिक पाहणी : शिवानी सावंत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » वहाळ जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांनी वेळेत करावी खरीप पिकांची ई-पिक पाहणी : शिवानी सावंत
चिपळूण

वहाळ जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांनी वेळेत करावी खरीप पिकांची ई-पिक पाहणी : शिवानी सावंत

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 8:13 am
Gramin Varta
49 Views
Share

चिपळूण: चालू खरीप हंगामातील पिकांची अचूक नोंद सातबारा उताऱ्यावर होण्याच्या दृष्टीने वहाळ जिल्हा परिषद गटातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी केले आहे. शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या ई-पिक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतातील चालू पिकांची नोंदणी थेट शासकीय दप्तरी अधिकृतपणे केली जात असल्याने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक ठरले आहे.

या मोहिमेच्या सुलभतेसाठी आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्यासाठी गावनिहाय ई-पिक पाहणी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घेतलेल्या खरीप पिकांची वस्तुनिष्ठ व अचूक माहिती उपलब्ध करून देऊन या सहाय्यकांच्या सहकार्याने नोंदणी पूर्ण करावी, असे सांगण्यात आले आहे. ई-पिक पाहणी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी संबंधित नियुक्त सहाय्यक अथवा महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वहाळ जिल्हा परिषद गटातील एकही पात्र शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहू नये आणि कोणाचीही नोंदणी प्रलंबित राहू नये, यासाठी बळीराजाने स्वतः पुढे येऊन ही मोहीम मुदतीत पूर्ण करावी, असा पुनरुच्चार सौ. शिवानी संदीप सावंत यांनी केला आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दिवाळी सणासाठी कोकण रेल्वे मार्गावर १२ विशेष गाड्यांची घोषणा

Gramin Varta
2 Min Read

A Comprehensive Look at the Current State of Technological Evolution

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पुष्कर गितेची द्वितीय क्रमांक पटकावत दमदार कामगिरी

Gramin Varta
1 Min Read

Scaling Peaks the Awe-Inspiring Beauty of High Altitude Travel

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

चिपळूण

रत्नागिरीतील वंचित सहा तालुक्यांचा तातडीने दुष्काळात समावेश करा; आमदार भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

2 Min Read
चिपळूण

कमी पावसाने कोकणात भात-नाचणी पिके करपली; उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट

2 Min Read
चिपळूण

सावर्डे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव प्रशिक्षण

2 Min Read
चिपळूण

रायफल शूटिंग स्पर्धेत जय सावंतचा अचूक वेध; सावर्डे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा, विभागस्तरावर निवड

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?