ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: महाराष्ट्रातून मान्सूनची अधिकृत ‘एक्झिट’; राज्यात सरासरी १९ टक्के घट, मराठवाडा अन् विदर्भात पावसाच्या तुटीने दुष्काळाचे सावट
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » महाराष्ट्रातून मान्सूनची अधिकृत ‘एक्झिट’; राज्यात सरासरी १९ टक्के घट, मराठवाडा अन् विदर्भात पावसाच्या तुटीने दुष्काळाचे सावट
महाराष्ट्र

महाराष्ट्रातून मान्सूनची अधिकृत ‘एक्झिट’; राज्यात सरासरी १९ टक्के घट, मराठवाडा अन् विदर्भात पावसाच्या तुटीने दुष्काळाचे सावट

Gramin Varta
Last updated: October 1, 2026 8:04 am
Gramin Varta
65 Views
Share

पुणे: महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून, १ जून ते ३० सप्टेंबर हा मान्सूनचा मुख्य हंगाम संपल्याची अधिकृत घोषणा पुणे वेधशाळेने केली आहे. यंदा राज्यभरात सरासरीच्या तुलनेत केवळ ८१ टक्के पावसाची नोंद झाली असून, एकूण १९ टक्के पावसाची घट नोंदवली गेली आहे. पावसाचा मुख्य काळ संपुष्टात आला असला तरी येत्या दोन ते तीन दिवसांत परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याची माहिती वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात राज्याच्या विविध विभागांत पावसाने ओढ दिल्याने विषम स्थिती पाहायला मिळाली. कोकण विभागात १४ टक्के, मध्य महाराष्ट्रात ११ टक्के आणि विदर्भात २३ टक्के तूट राहिली आहे. मात्र, सर्वाधिक भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात निर्माण झाली असून, तेथे तब्बल ४० टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्यात शेतकरी वर्गावर गंभीर संकट ओढवले आहे. पुढील एक ते दोन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वगळता १ आणि २ ऑक्टोबरनंतर कोणतीही नवी हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने राज्यात पावसाची शक्यता मावळली आहे.

जिल्हानिहाय आकडेवारीनुसार मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात तब्बल ५१ टक्के, हिंगोलीत ४९ टक्के, जालन्यात ४८ टक्के, धाराशिवमध्ये ४५ टक्के, परभणीत ४० टक्के, लातूरमध्ये ३८ टक्के, नांदेडमध्ये ३४ टक्के आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये १९ टक्के तुटीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ५८ टक्के तुटीने परिस्थिती बिकट झाली आहे. याशिवाय सिंधुदुर्गात ३६ टक्के, नाशिकमध्ये ३३ टक्के, सातार्‍यात २८ टक्के, सांगलीत २४ टक्के, पालघरमध्ये २१ टक्के, पुण्यात १४ टक्के, कोल्हापुरात १५ टक्के, रत्नागिरीत १६ टक्के, ठाण्यात ११ टक्के, मुंबई उपनगरात ९ टक्के आणि रायगडमध्ये ६ टक्के तूट राहिली आहे.

उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात ३९ टक्के, धुळ्यात १९ टक्के तर जळगावात ११ टक्के तूट नोंदली गेली. विदर्भात अमरावतीत ४० टक्के, अकोल्यात ३७ टक्के, वाशीममध्ये ३५ टक्के, चंद्रपुरात २९ टक्के, नागपूर व वर्ध्यात प्रत्येकी २८ टक्के, यवतमाळमध्ये २३ टक्के, बुलढाण्यात १७ टक्के, भंडाऱ्यात १६ टक्के आणि गडचिरोलीत १५ टक्के पावसाची घट झाली आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात सरासरी तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि विदर्भ तसेच मराठवाड्यात तापमानाचा पारा वाढलेलाच राहून ‘ऑक्टोबर हीट’ची तीव्रता जाणवेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरचे अजिंक्यपद

Gramin Varta
2 Min Read

दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात

Gramin Varta
1 Min Read

संगमेश्वर नावडी येथील सरिता कुचेकर यांचे वृद्धापकाळाने निधन; आज रात्री अंत्ययात्रा

Gramin Varta
1 Min Read

ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना’ मोर्चाचा बदलला मार्ग; मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

टीईटी पेपरफुटी : ठाणे पोलिसांकडून 18 आरोपींविरुद्ध 3,500 पानांचे दोषारोपपत्र

2 Min Read
महाराष्ट्र

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार; राज्यात उभारणार २० हजार सुसज्ज कायमस्वरूपी परीक्षा केंद्रांचे सामायिक जाळे

2 Min Read
महाराष्ट्र

येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय; निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

5 Min Read
महाराष्ट्र

मराठवाड्यात पावसाची ३१ टक्के तूट; ५,५६० गावांवर संकट

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?