ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मंडणगड : तुळशी येथे बंद घर फोडले; पावणेदोन लाखांचे दागिने, रोख रकमेसह तांब्या-पितळेची भांडी लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मंडणगड : तुळशी येथे बंद घर फोडले; पावणेदोन लाखांचे दागिने, रोख रकमेसह तांब्या-पितळेची भांडी लंपास
मंडणगड

मंडणगड : तुळशी येथे बंद घर फोडले; पावणेदोन लाखांचे दागिने, रोख रकमेसह तांब्या-पितळेची भांडी लंपास

Gramin Varta
Last updated: October 11, 2026 12:57 pm
Gramin Varta
69 Views
Share
Masked thief caught on security cameras

मंडणगड: तालुक्यातील तुळशी येथे अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने, तांब्या-पितळेची भांडी आणि रोख रकमेसह सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

मूळचे तुळशी येथील रहिवासी असलेले लखन परशुराम मोहिते (वय ३३) हे नोकरीनिमित्त सध्या आपल्या कुटुंबासह हिंजवडी फेज १, पुणे येथे वास्तव्यास आहेत. गावातील त्यांचे घर बंद अवस्थेत होते. दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लखन मोहिते यांची बहीण घराची साफसफाई करण्यासाठी गेली असता, तिला घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता घरातील कपाटे उचकटलेली आणि साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. तिने तत्काळ ही माहिती लखन मोहिते यांना कळवली. त्यानंतर मोहिते यांनी तातडीने पुण्यातून गावी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता घरात मोठी चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

अज्ञात चोरट्यांनी २० सप्टेंबर सायंकाळी चार ते ८ ऑक्टोबर सकाळी साडेदहा या कालावधीत घराच्या मुख्य दरवाजाचा लोखंडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटांचे लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे सत्तर हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे जुने सोन्याचे मंगळसूत्र, एक लाख रुपये किमतीचे सुमारे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, सुमारे पाच हजार रुपयांची जुनी तांब्या-पितळेची भांडी (ज्यामध्ये तांबे, ताट, टोप आणि डब्यांचा समावेश आहे) तसेच वीस हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी लखन मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडणगड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) (तसेच भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. बंद घरांची रेकी करून ही चोरी केली असल्याचा संशय व्यक्त केला जात असून मंडणगड पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.

Total Visitors :

5468536
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दोन महिन्यांची मेहनत; संगमेश्वरात खातू बंधूंनी साकारली ‘जुनी मुंबई ते नवी मुंबई’!

Gramin Varta
2 Min Read

राजापूर : शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहावर शिक्षकांना मार्गदर्शन; हरळ येथे केंद्रस्तरीय परिषद संपन्न

Gramin Varta
3 Min Read

दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप

Gramin Varta
1 Min Read

पुढील वर्षीचे जिल्हा साहित्य संमेलन सत्कोंडीत होणार; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांची घोषणा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

मंडणगड

मंडणगड : सडे जाधववाडी येथे कुत्रा मारल्याच्या संशयावरून वृद्धाला काठीने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

2 Min Read
मंडणगड

मंडणगडात भरदिवसा घरफोडी; कपाटातील लॉकर फोडून सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

1 Min Read
मंडणगड

डोंगर-दऱ्यांचे खडतर आव्हान पेलत महावितरणचे ‘मिशन म्हाप्रळ’ फत्ते; ४८ तासांच्या अथक परिश्रमांनंतर परिसर पुन्हा प्रकाशमान

3 Min Read
मंडणगड

मंडणगड: दहागाव निमदेवाडीत गुरांच्या गोठ्याला भीषण आग; दोन दुभत्या गाईंचा होरपळून मृत्यू

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?