ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मंडणगड : सडे जाधववाडी येथे कुत्रा मारल्याच्या संशयावरून वृद्धाला काठीने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मंडणगड : सडे जाधववाडी येथे कुत्रा मारल्याच्या संशयावरून वृद्धाला काठीने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
मंडणगड

मंडणगड : सडे जाधववाडी येथे कुत्रा मारल्याच्या संशयावरून वृद्धाला काठीने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: November 4, 2026 1:20 pm
Gramin Varta
71 Views
Share

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील सडे जाधववाडी येथे भाताची राखण करत बसलेल्या एका ६४ वर्षीय वृद्धाला ‘माझ्या कुत्र्याला का मारले’ असा जाब विचारत तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत वृद्धाच्या डोक्यात काठी मारून गंभीर दुखापत करण्यात आली असून, याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सडे जाधववाडी येथील रहिवासी दत्ताराम परशुराम जाधव (वय ६४) हे गावातील बंद असलेल्या अंगणवाडीच्या आवारात त्यांचे साडू दिनकर सिताराम पवार यांच्या कापलेल्या भाताच्या पिकाची राखण करत बसले होते. सोमवार, २ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याच वाडीतील अल्पेश सोपान जाधव हा तिथे आला. त्याने फिर्यादी दत्ताराम जाधव यांना ‘तू माझ्या कुत्र्याला का मारलेस?’ अशी विचारणा करत थेट वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमधील बाचाबाची वाढल्यानंतर वाडीतील समाधान तुकाराम जाधव आणि सोपान सिताराम जाधव हे दोघेही त्या ठिकाणी धावून आले.

या तिघांनी मिळून प्रथम दत्ताराम जाधव यांना जोरदार धक्काबुक्की केली. त्यानंतर अल्पेश जाधव याने हातातील लाकडी काठीने दत्ताराम यांच्या डोक्यावर कपाळाच्या वरील बाजूस जोरदार प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात दत्ताराम जाधव गंभीर जखमी झाले. त्याच वेळी समाधान जाधव आणि सोपान जाधव यांनी त्यांना हाताच्या ठोशांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

हल्ल्यात जखमी झालेल्या दत्ताराम जाधव यांच्यावर उपचार करण्यात आले असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडणगड पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे. याप्रकरणी अल्पेश सोपान जाधव, समाधान तुकाराम जाधव आणि सोपान सिताराम जाधव या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) अन्वये (गु.र.नं. १२८/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडणगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :

5468436
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मानवी जन्माचे सार्थक समाजहिताच्या कार्यातूनच : पोलीस निरीक्षक मितीश केणी

Gramin Varta
2 Min Read

पोलिसांनी मानवी तस्करीमागील संपूर्ण जाळे उघड करण्यावर भर द्यावा – पोलीस महासंचालक सदानंद दाते

Gramin Varta
3 Min Read

लांजा: आरगाव येथे विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

Gramin Varta
2 Min Read

खेड : घाणेखुंट येथे २१ वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

मंडणगड

मंडणगड: दगडाला ठेच लागून डोक्यावर पडल्याने जखमी झालेल्या वृद्धाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

2 Min Read
मंडणगड

मंडणगड येथे ढाब्यावर जिन्यावरून पडून जखमी झालेल्या आचाऱ्याचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

2 Min Read
मंडणगड

मंडणगड शहरावर ऐन ऑक्टोबरमध्येच भीषण पाणीटंचाईचे सावट; जुनी नळपाणी योजना ठरतेय तोकडी

2 Min Read
मंडणगड

पाणीपट्टीवरून मुरादपूरच्या सरपंचांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; मंडणगड पोलिसांत गुन्हा

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?