ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मंडणगड येथे ढाब्यावर जिन्यावरून पडून जखमी झालेल्या आचाऱ्याचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मंडणगड येथे ढाब्यावर जिन्यावरून पडून जखमी झालेल्या आचाऱ्याचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू
मंडणगड

मंडणगड येथे ढाब्यावर जिन्यावरून पडून जखमी झालेल्या आचाऱ्याचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
Last updated: October 4, 2026 10:00 am
Gramin Varta
3 Views
Share

मंडणगड : येथील एका ढाब्यावर काम करताना जिन्यावरून पाय घसरून पडल्याने डोक्याला गंभीर मार लागलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजेश बबन तांबे (वय ४५, रा. वलोते, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) असे मयत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश तांबे हे मंडणगड येथील ‘शिगवण ढाबा’ येथे गेल्या चार वर्षांपासून आचारी (कुक) म्हणून काम करत होते. १ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कामावर असताना जिन्यावरून पाय घसरून ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जबर मार लागल्याने ते जागीच बेशुद्ध पडले. घटनेचे गांभीर्य ओळखून ढाब्याचे मालक वल्लभ शिगवण यांनी त्यांना तातडीने डेरवण येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे सिटी स्कॅन तपासणीअंती मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचे निष्पन्न झाले व डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी २ सप्टेंबर रोजी सकाळी मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले.

केईएम रुग्णालयात त्यांच्या डोक्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली व त्यांच्यावर अतिदक्षता विभागात महिनाभर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. या घटनेबाबत मयताचा मुलगा प्रितेश राजेश तांबे याने दिलेल्या खबरीवरून मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक १७/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5435509
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

विद्युत अपघातात जनावरे दगावल्यास आता ५० हजारांची मदत; महावितरणकडून नुकसानभरपाईच्या रक्कमेत घसघशीत वाढ

Gramin Varta
2 Min Read

मिरजोळे येथे वृद्धाचा घरातील शौचालयात आकस्मिक मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

पावसाअभावी भातशेती संकटात; जिल्हाधिकाऱ्यांकडून थेट बांधावर जाऊन पाहणी

Gramin Varta
3 Min Read

पाककलेचा समृद्ध वारसा! लांजातील ज्ञानेश्वरी वाघधरेने अवघ्या काही तासांत साकारला बाप्पासाठी ४२ नैवेद्यांचा थाट

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

मंडणगड

मंडणगडात भरदिवसा घरफोडी; कपाटातील लॉकर फोडून सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

1 Min Read
मंडणगड

मंडणगड : आतकोळ फाट्यावर भरधाव कारची एसटी बसला जोरदार धडक; दोघे जखमी

2 Min Read
मंडणगड

पाणीपट्टीवरून मुरादपूरच्या सरपंचांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; मंडणगड पोलिसांत गुन्हा

1 Min Read
मंडणगड

मंडणगड: हातात चाकू घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्यावर गुन्हा

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?