ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मंडणगड : आंबेत मार्गावर अवैध खैर वाहतूक वन विभागाने उधळली; तस्कर अटकेत, वाहनासह लाखो रुपयांचे खैर लाकूड जप्त!
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मंडणगड : आंबेत मार्गावर अवैध खैर वाहतूक वन विभागाने उधळली; तस्कर अटकेत, वाहनासह लाखो रुपयांचे खैर लाकूड जप्त!
मंडणगड

मंडणगड : आंबेत मार्गावर अवैध खैर वाहतूक वन विभागाने उधळली; तस्कर अटकेत, वाहनासह लाखो रुपयांचे खैर लाकूड जप्त!

Gramin Varta
Last updated: October 18, 2026 5:48 pm
Gramin Varta
202 Views
Share

मंडणगड: आंबेत-म्हाप्रळ मार्गावर बेकायदेशीरपणे खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर वन विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत खैर वनउपजासह वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी एका इसमावर भारतीय वन अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वन विभागाच्या या धडक पावलामुळे अवैध लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेत मार्गे अवैध खैर लाकडाची वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त बातमी वन विभागाच्या पथकाला खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने आंबेत पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी टाटा कंपनीच्या इंट्रा व्ही ३० (क्रमांक एमएच ०८ एपी ४१२२) या वाहनातून विनापरवाना खैराचे सोलीव नग व सोलीव किटा या वनउपजाची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने तातडीने कारवाई करत १.००३ घनमीटर आकाराचे २६२ सोलीव नग आणि १.२३८ घनमीटर आकाराचे सोलीव किटा असा मुद्देमाल जप्त केला. या जप्त केलेल्या खैराच्या लाकडाची किंमत सुमारे १२ हजार ६८२ रुपये इतकी असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले ३ लाख रुपये किमतीचे वाहनही वन विभागाने ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी अरविंद सखाराम काते (रा. मंडणगड, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ तसेच महाराष्ट्र वन नियमावली २०१४ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईचा पुढील तपास मांदाटणे वनपरिमंडळाचे वनपरिमंडळ अधिकारी तुळशीराम चावरेकर करत आहेत.

दरम्यान, आंबेत मार्गे मंडणगड परिसरामध्ये होणाऱ्या अवैध खैर वाहतुकीला कायमचा पायबंद घालण्यासाठी वन विभागामार्फत लवकरच आंबेत येथे विशेष तपासणी नाका (चेक पोस्ट) उभारण्यात येणार आहे. वनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी अवैध वृक्षतोड, वन्यजीव शिकार, वनवणवा अथवा अवैध लाकूड वाहतुकीबाबत नागरिकांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर अथवा स्थानिक वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

Total Visitors :

5468475
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पालवणच्या पाणी कमिटी अध्यक्षपदी भरत सावर्डेकर यांची बिनविरोध निवड; पहिल्याच सभेत पारदर्शक कारभाराचा ऐतिहासिक निर्णय

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी पोलिसांचा अंमली पदार्थ तस्करांना मोठा दणका; वर्षभरात ६४ गुन्हे, ९२ तस्कर गजाआड

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत खडपेवठार येथील अंगणवाडीत बाल मेळावा उत्साहात संपन्न; चिमुकल्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Gramin Varta
1 Min Read

दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय अखेर कार्यान्वित; दापोली, खेड आणि मंडणगडवासीयांची पायपीट थांबणार!

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

मंडणगड

मंडणगड शहरावर ऐन ऑक्टोबरमध्येच भीषण पाणीटंचाईचे सावट; जुनी नळपाणी योजना ठरतेय तोकडी

2 Min Read
मंडणगड

मंडणगड : तिडे निमदेवाडी येथील जंगलातील विषारी फळ खाल्लेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू

2 Min Read
मंडणगड

मंडणगड: दहागाव निमदेवाडीत गुरांच्या गोठ्याला भीषण आग; दोन दुभत्या गाईंचा होरपळून मृत्यू

2 Min Read
मंडणगड

मंडणगडात भरदिवसा घरफोडी; कपाटातील लॉकर फोडून सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?