ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय अखेर कार्यान्वित; दापोली, खेड आणि मंडणगडवासीयांची पायपीट थांबणार!
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय अखेर कार्यान्वित; दापोली, खेड आणि मंडणगडवासीयांची पायपीट थांबणार!
रत्नागिरी

दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय अखेर कार्यान्वित; दापोली, खेड आणि मंडणगडवासीयांची पायपीट थांबणार!

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 12:30 pm
Gramin Varta
175 Views
Share

रत्नागिरी/ तुषार पाचलकर: रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर भागातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून दापोली येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यास राज्य शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. महसूल विभागामार्फत या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय जारी करण्यात आला असून, यामुळे प्रशासकीय कामकाजासाठी रत्नागिरी मुख्यालयाची पायपीट करणाऱ्या दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्यांतील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण लक्षात घेता उत्तर रत्नागिरीतील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी जिल्हा मुख्यालयाचे मोठे अंतर पार करावे लागत होते. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करून प्रशासन अधिक लोकाभिमुख करणे आणि शासकीय योजनांची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने दापोलीत हे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या नव्या निर्णयानुसार दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्यांचा समावेश दापोली अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात करण्यात आला आहे, तर रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर (देवरुख), लांजा आणि राजापूर या उर्वरित सहा तालुक्यांचा कारभार रत्नागिरी अपर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सुरू राहणार आहे.

नव्याने निर्माण करण्यात आलेल्या या दोन्ही कार्यालयांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि नियंत्रक अधिकारी म्हणून कोकण विभागीय आयुक्त कामकाज पाहणार आहेत. दापोलीच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आले आहे. याशिवाय, अपर जिल्हाधिकारी व तहसीलदार या संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना थेट शासनस्तरावरून केली जाणार असून, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती उपलब्ध मनुष्यबळातून जिल्हाधिकारी स्तरावर तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कार्यालयाचे कामकाज तातडीने सुरू व्हावे यासाठी प्रारंभी तात्पुरत्या जागेची निश्चिती करून, त्यानंतर कायमस्वरूपी जागेचा शोध घेत नवीन इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या सर्व प्रशासकीय व पायाभूत तयारीची पूर्तता करून पुढील १५ दिवसांत शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाची सुरुवात केली जाणार आहे. दापोलीत हे कार्यालय सुरू झाल्यामुळे उत्तर रत्नागिरीतील शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे महसुली प्रश्न स्थानिक पातळीवर जलद गतीने निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Total Visitors :

5427562
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा १७-१ ने उडवला धुव्वा

Gramin Varta
3 Min Read

नेपाळला दिलासा : भारताकडून ३१ डिसेंबरपर्यंत १८ तास वीज निर्यातीला मंजुरी

Gramin Varta
1 Min Read

हर्णे सागरी किनाऱ्यावर दोन फिनलेस पॉर्पोईज मृतावस्थेत आढळले; मृत्यूचे कारण अस्पष्ट

Gramin Varta
2 Min Read

दापोलीच्या मातीतल्या शुभम लोंढेची राष्ट्रीय स्तरावर धडक; पॉवरलिफ्टिंगमध्ये दुहेरी रौप्यपदक पटकावत उंचावला महाराष्ट्राचा झेंडा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी विमानतळ आयएलएससाठी घरे व मंदिरे पाडणार नाही; बाधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत दमण मॉडेलचा पर्याय तपासण्याचे आदेश

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : लॉजच्या आवारातील क्रूझर पेटवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: अरेबियन समुद्रात इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू; जयगड सागरी पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत पावसाळा संपण्यापूर्वीच उन्हाचा कडाका; ऐन सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चे चटके

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?