ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मंडणगड : तिडे निमदेवाडी येथील जंगलातील विषारी फळ खाल्लेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मंडणगड : तिडे निमदेवाडी येथील जंगलातील विषारी फळ खाल्लेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू
मंडणगड

मंडणगड : तिडे निमदेवाडी येथील जंगलातील विषारी फळ खाल्लेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
Last updated: October 8, 2026 4:23 pm
Gramin Varta
62 Views
Share
One pair of Feet alone in Bed on White Sheets sleeping under a blanket, relaxion cute

मंडणगड (प्रतिनिधी): तालुक्यातील तिडे निमदेवाडी येथील एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा जंगलातील विषारी ‘रामानंद’ फळ खाल्ल्याने प्रकृती खालावून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लक्ष्मी पांडुरंग निमदे (वय ६५, व्यवसाय-मोलमजुरी, रा. तिडे निमदेवाडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे निमदेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

मयत महिलेचा मुलगा प्रकाश पांडुरंग निमदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी लक्ष्मी निमदे यांनी जंगलातील विषारी मानले जाणारे रामानंद फळ खाल्ले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांना तीव्र विषबाधा होऊन उलट्या व मळमळीचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने सायंकाळी सात वाजता ग्रामीण रुग्णालय, मंडणगड येथे दाखल केले. तेथे १ ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार १ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाआठ वाजता त्यांना रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान प्रकृतीत सुधारणा न होता अखेर ५ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5469300
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापूर: महायुती सरकार शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी; गावागावांत वनराई बंधारे बांधून दुष्काळावर मात करूया : आमदार निलेश राणे

Gramin Varta
2 Min Read

खेरवसे जाधववाडीत बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; तातडीने कॅमेरा ट्रॅप लावून उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी

Gramin Varta
1 Min Read

चिपळूण: कोंडमळा येथे दारूच्या व्यसनातून तरुणाची गळफास लावून आत्महत्या

Gramin Varta
1 Min Read

चिपळूण : विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाची दिवाळी कातकरी बांधवांसोबत

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

मंडणगड

मंडणगड येथे ढाब्यावर जिन्यावरून पडून जखमी झालेल्या आचाऱ्याचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

2 Min Read
मंडणगड

मंडणगड : लाटवण विजेच्या तारेचा तीव्र धक्का लागून १० वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

2 Min Read
मंडणगड

मंडणगड : तुळशी येथे बंद घर फोडले; पावणेदोन लाखांचे दागिने, रोख रकमेसह तांब्या-पितळेची भांडी लंपास

2 Min Read
मंडणगड

मंडणगडात भरदिवसा घरफोडी; कपाटातील लॉकर फोडून सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?