ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दोन महिन्यांची मेहनत; संगमेश्वरात खातू बंधूंनी साकारली ‘जुनी मुंबई ते नवी मुंबई’!
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दोन महिन्यांची मेहनत; संगमेश्वरात खातू बंधूंनी साकारली ‘जुनी मुंबई ते नवी मुंबई’!
संगमेश्वर

दोन महिन्यांची मेहनत; संगमेश्वरात खातू बंधूंनी साकारली ‘जुनी मुंबई ते नवी मुंबई’!

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 2:17 pm
Gramin Varta
63 Views
Share

कल्पनेपासून प्रत्यक्ष देखाव्यापर्यंत कुटुंबाची एकजूट; मराठी अस्मिता आणि मुंबईच्या संस्कृतीचा अनोखा कलाविष्कार

धामणी : नमन-जाखडी, भजन-कीर्तन आणि समृद्ध गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या संगमेश्वरात यंदा खातू बंधूंच्या मेहनतीचा आणि कल्पकतेचा अनोखा आविष्कार पाहायला मिळत आहे. ‘जुनी मुंबई ते नवी मुंबई’ हा भव्य देखावा साकारण्यासाठी खातू कुटुंबाने तब्बल दोन महिने सातत्याने मेहनत घेतली असून, कल्पना, नियोजन, निर्मिती आणि सजावट अशा प्रत्येक टप्प्यावर कुटुंबातील सदस्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले आहे.

गणेशोत्सवाच्या काही दिवसांपूर्वीच देखाव्याची संकल्पना निश्चित करून त्याच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात करण्यात आली. दिवस-रात्र वेळ देत, बारकावे तपासत आणि अनेकदा बदल करत खातू बंधूंनी हा देखावा आकाराला आणला. केवळ सजावट म्हणून नव्हे, तर पाहणाऱ्याला मुंबईचा इतिहास आणि मराठी माणसाची अस्मिता अनुभवता यावी, या उद्देशाने प्रत्येक भाग विचारपूर्वक तयार करण्यात आला.

‘गिरणगावाचा घाम, दहीहंडीचा जल्लोष, गणपतीची भक्ती, शिवरायांची प्रेरणा आणि आधुनिकतेची झेप… हाच आमचा मुंबईचा अभिमान!’ या संकल्पनेतून जुन्या मुंबईतील गिरणगाव, कष्टकरी जीवन, दहीहंडीचा जल्लोष, गणेशभक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा यांचे दर्शन घडते. त्याचवेळी आधुनिक नवी मुंबईची झपाट्याने बदलणारी ओळखही या देखाव्यातून मांडण्यात आली आहे.

‘मुंबई… फक्त शहर नाही, तर मराठी माणसाच्या अस्मितेची साक्ष आहे,’ हा विचार या देखाव्याचा गाभा आहे. संगमेश्वरच्या सांस्कृतिक मातीत मुंबईचा हा प्रवास साकारताना परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख मेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या देखाव्याच्या निर्मितीत शंकर खातू, अभिषेक खातू, शिवांश खातू, श्वेता खातू, शशांक खातू, शुभम खातू आणि यश खातू यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रत्येकाने आपल्या परीने जबाबदारी स्वीकारत दोन महिन्यांच्या मेहनतीत योगदान दिले. त्यामुळे हा देखावा केवळ एका व्यक्तीची कल्पना न राहता संपूर्ण खातू कुटुंबाच्या एकजुटीचे आणि मेहनतीचे प्रतीक ठरला आहे.

“हा देखावा उभा करण्यासाठी दोन महिने सातत्याने मेहनत घेतली. वेळ, श्रम आणि कल्पकता यांचा कस लागला; मात्र अंतिम रूप पाहिल्यानंतर सगळा थकवा दूर झाला. संगमेश्वरच्या गणेशोत्सवात काहीतरी वेगळे आणि अर्थपूर्ण सादर करावे, तसेच मुंबईची संस्कृती आणि मराठी अस्मिता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, या भावनेतून हा देखावा साकारला,” अशी भावना अभिषेक खातू यांनी व्यक्त केली.

कुटुंबाची एकजूट, दोन महिन्यांचा अथक परिश्रम आणि सांस्कृतिक विषयाची कल्पक मांडणी यामुळे खातू बंधूंचा ‘जुनी मुंबई ते नवी मुंबई’ हा देखावा संगमेश्वरच्या गणेशोत्सवातील लक्षवेधी कलाविष्कार ठरत आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

महिला शेतकऱ्यांना अधिकृत सन्मान; राज्यभरात प्रमाणपत्र नोंदणी व वितरणाची धडक मोहीम सुरू, १७ ऑक्टोबरपर्यंत संधी

Gramin Varta
2 Min Read

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या संरक्षणासाठी मोलाचा सल्ला

Gramin Varta
2 Min Read

कळझोंडी उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ६२ ग्रामस्थांनी घेतला लाभ

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून २.६५ लाखांचे दागिने लंपास

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर परिसरात गौरी-गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन; चाकरमान्यांच्या उपस्थितीने कोकण फुलले

2 Min Read
संगमेश्वर

Navigating the Cosmos to Uncover the Mysteries of the Universe

7 Min Read
संगमेश्वर

देवरुख : रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वप्नील पेडामकरच्या कुटुंबाला वनविभागाची १० लाखांची मदत

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?