ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या संरक्षणासाठी मोलाचा सल्ला
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या संरक्षणासाठी मोलाचा सल्ला
गाव शिवार

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या संरक्षणासाठी मोलाचा सल्ला

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 8:02 pm
Gramin Varta
16 Views
Share

रत्नागिरी : चालू वर्षी खरीप हंगामात रत्नागिरी जिल्ह्यात भात व नाचणीची सुमारे ५३ हजार ६२८ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आणि अल-निनोचे संकट असल्यामुळे पिकांना पावसाचा ताण बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या संरक्षणासाठी तातडीने हवामान आधारित कृषी सल्ला देण्यात आला आहे. खरीप हंगामातील पिकांचे संभाव्य नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने वेळोवेळी दिलेल्या सल्ल्यानुसार योग्य नियोजन करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

हवामानाची सद्यस्थिती आणि पिकांची स्थिती

जिल्ह्यात जून २०२६ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण २६३४.४० मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या तुलनेत ८८ टक्के पर्जन्यमान झाले आहे. सद्यस्थितीत बहुतांश भागात वेळेत लागवड केलेल्या हळव्या जातींच्या (उदा. रत्नागिरी १, रत्नागिरी २४ व इतर वाण) लोंबी भरल्या असून त्या १५ ऑक्टोबरपर्यंत काढणीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जातींवर पावसाच्या ताणाचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र, उशिरा लागवड केलेल्या हळव्या जातींना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे महत्त्वाचे सल्ले:
पाण्याचे व्यवस्थापन: ज्या ठिकाणी पाण्याचा ताण जाणवत आहे, तिथे शेतकऱ्यांनी भात खाचरामध्ये ५ ते १० सेमी पाण्याची पातळी राखावी. यासाठी तातडीने बांधदुरुस्त करून उपलब्ध जलस्रोतांतून पाणी खाचरांमध्ये वळवावे.

नत्र खताचा वापर: हळव्या भात जाती फुलोरा अवस्थेत असताना युरियाचा तिसरा हप्ता (४३५ ग्रॅम प्रति गुंठा) जमिनीत पुरेसा ओलावा असताना व शक्यतो दुपारनंतर पानांवर ओलावा नसताना व पावसाची उघडीप असताना द्यावा. निमगरव्या व गरव्या जातींसाठी पाऊस लांबल्यास हा हप्ता तात्पुरता टाळावा.

करपा व जिवाणूजन्य करपा: ढगाळ हवामानामुळे प्रादुर्भाव झाल्यास ट्रायसायक्लाझोल किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड सोबत स्ट्रप्टोसायक्लाइनची दर १५ दिवसांनी फवारणी करावी.

तपकिरी तुडतुडे: प्रादुर्भाव दिसल्यास इमिडाक्लोप्रीड किंवा लॅमडासाईहेलोथ्रीन  फवारणी करावी.

खोडकीड व पाने गुंडाळणारी अळी / निळे भुंगेरे: नियंत्रणासाठी क्वीनालफॉस किंवा लॅमडासाईहॅलोथ्रीनची शिफारस केलेल्या प्रमाणात फवारणी करावी.

शंखि गोगलगाय (नाचणी पीक): गोगलगाई नियंत्रणासाठी शेतात गिरीपुष्प किंवा कोबीच्या पानांचे ढीग ठेवावे व जमा झालेल्या गोगलगाय गोळा करुन रॉकेलमिश्रीत पाण्यात बुडवून  नष्ट कराव्यात.

Total Visitors :

5427414
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमसाठी ‘चलो दिल्ली’; १ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन

Gramin Varta
4 Min Read

२९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कापशी नदीवरील वीर-काजुर्ली पुलाला अखेर गती; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागेची प्रत्यक्ष पाहणी

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरी: मुरुगवाड्यात विक्रीच्या उद्देशाने हेरॉईन बाळगणारा २२ वर्षीय तरुण ताब्यात

Gramin Varta
1 Min Read

मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; महाडजवळ दीड कोटींची गोवा बनावटीची व्हिस्की जप्त, ट्रकसह चालकाला बेड्या

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

गाव शिवार

विद्युत अपघातात जनावरे दगावल्यास आता ५० हजारांची मदत; महावितरणकडून नुकसानभरपाईच्या रक्कमेत घसघशीत वाढ

2 Min Read
गाव शिवार

कोकणातील दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाची नवी पशुधन विमा योजना; पशूंच्या सुरक्षेसाठी ८५ टक्के अनुदान

3 Min Read
गाव शिवार

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?