ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: विलवडे रेल्वे स्थानकावरील आंदोलन रेल्वे प्रशासनाच्या आश्वासना नंतर तात्पुरते स्थगित
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » विलवडे रेल्वे स्थानकावरील आंदोलन रेल्वे प्रशासनाच्या आश्वासना नंतर तात्पुरते स्थगित
लांजा

विलवडे रेल्वे स्थानकावरील आंदोलन रेल्वे प्रशासनाच्या आश्वासना नंतर तात्पुरते स्थगित

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 3:49 pm
Gramin Varta
62 Views
Share

रेल्वे प्रशासनाकडून विविध मागण्यांबाबत आश्वासन; लेखी उत्तर न मिळाल्यास २० ऑक्टोबरला बेलापूर येथे आंदोलन, २३ नोव्हेंबरला रेल रोकोचा इशारा

लांजा/अरबाज नेवरेकर: विलवडे रेल्वे स्थानकावर विविध मागण्यांसाठी सकाळी ९ वाजता सुरू करण्यात आलेले सर्वपक्षीय आंदोलन तहसीलदार प्रियंका ढोले यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. रेल्वे स्थानकावर प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यासह प्रवाशांच्या सुविधांशी संबंधित विविध मागण्यांवर प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले.

विलवडे स्थानकावर नेत्रावती एक्स्प्रेस, मत्स्यगंधा, मांडवी एक्स्प्रेस तसेच जनशताब्दी एक्स्प्रेसला थांबा मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाची प्रत रत्नागिरी कार्यालयाकडून आंदोलनकर्त्यांना देण्यात आली.

स्थानक परिसरातील प्रवाशांच्या सुविधांसंदर्भातही विविध कामे हाती घेण्याचे आश्वासन देण्यात आले. उघड्या संडासच्या टाकीचे काम, फलाटावर दोन पंखे, जिन्याच्या खाली दोन पंखे बसविणे, फलाटालगत वाढलेले गवत साफ करणे, प्रतीक्षागृह तसेच अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मार्गाची स्वतंत्र व्यवस्था करणे, यासह रस्त्यावरील पथदिव्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येईल, अशी माहिती आंबार्डेकर यांनी दिली.

सन २०२६-२७ च्या नियोजनात विलवडे रेल्वे स्थानकावरील दुसऱ्या फलाटाचे कामही बजेटमध्ये प्रस्तावित करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

दरम्यान, मुख्य रस्त्यापासून विलवडे रेल्वे स्थानकापर्यंतच्या सुमारे ७०० मीटर रस्त्याच्या कामासाठी तसेच सुशोभीकरणासाठी आमदार किरण सामंत यांनी ९ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती सभेत देण्यात आली. याबद्दल आमदार किरण सामंत यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

या आंदोलनाला प्रवासी, नागरिकांसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग लाभला. साडेतीनशेहून अधिक नागरिक व प्रवाशांनी आंदोलनस्थळी उपस्थिती दर्शविली.

मात्र, हे आंदोलन केवळ तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. २० ऑक्टोबरपूर्वी रेल्वे प्रशासनाकडून मागण्यांबाबत लेखी उत्तर मिळाले नाही, तर २० ऑक्टोबर रोजी बेलापूर येथे नियोजित उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच मागण्यांची पूर्तता न झाल्यास २३ नोव्हेंबर रोजी रेल रोको आंदोलन करण्यावर आंदोलनकर्ते ठाम असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने रत्नागिरी येथे रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी रेल्वे अधिकारी बापट यांनी केलेल्या सहकार्याबद्दल संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी मुंबई रेल्वे संघर्ष समिती तसेच विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास

Gramin Varta
1 Min Read

गुहागर: ऐन गणेशोत्सवात पालशेत-जोईलवाडीत पाणीटंचाई; महिला वर्गाची हंडा-डोक्यावरून पायपीट

Gramin Varta
2 Min Read

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार

Gramin Varta
2 Min Read

किल्ले रायगड रोपवे सेवा तात्पुरती ठप्प; प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा: उड्डाणपुलावर भरधाव कारच्या धडकेत मजुराचा जागीच मृत्यू; चालक घटनास्थळावरून पसार

2 Min Read
लांजा

लांजा पोलिसांच्या आवाहनाला कुवेतील सिद्धिविनायक मंडळाची साथ; ‘डीजेमुक्त गणेशोत्सवा’च्या संकल्पाबद्दल पोलिसांकडून गौरव

1 Min Read
लांजा

विलवडे रेल्वे स्थानकावरील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांची संघर्ष समितीसोबत बैठक

2 Min Read
लांजा

लांजा : दारूच्या नशेत विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?