ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा येथे झाडी-झुडपांच्या आडोशाला गांजा ओढणाऱ्या एकावर पोलिसांची कारवाई
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा येथे झाडी-झुडपांच्या आडोशाला गांजा ओढणाऱ्या एकावर पोलिसांची कारवाई
लांजा

लांजा येथे झाडी-झुडपांच्या आडोशाला गांजा ओढणाऱ्या एकावर पोलिसांची कारवाई

Gramin Varta
Last updated: October 29, 2026 4:42 pm
Gramin Varta
253 Views
Share

लांजा : लांजा तालुक्यातील गोंडेसखळ रोडवरील सड्यावर जंगलमय भागात झाडी-झुडपांच्या आडोशाला बसून बेकायदेशीररीत्या गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका व्यक्तीवर लांजा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. कुणाल मदन होलम (वय ४० वर्षे, रा. लांजा एस.टी. स्टँडजवळ, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गोंडेसखळ रस्त्यावरील निर्जन सड्यावर ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितेश चंद्रकांत आर्डे (ब.नं. १०७) व त्यांचे सहकारी गोंडेसखळ रोड परिसरात गस्तीवर असताना, आरोपी कुणाल होलम हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलमय भागात झाडी-झुडपांच्या आडोशाला संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांनी तातडीने धाड टाकून खातरजमा केली असता तो बेकायदेशीररीत्या गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितेश आर्डे यांच्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा (एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५) चे कलम ८ (क) आणि २७ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २८०/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5468436
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोलीतून पालघरमधील कामगार बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

ग्रामसभेच्या आराखड्यांतून दुष्काळमुक्तीचा ध्यास; राजापूर उपविभागाची अनोखी मोहीम

Gramin Varta
3 Min Read

अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कठोर निर्बंध आणा; सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण सूचना

Gramin Varta
2 Min Read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय संघ पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत; कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४-३ ने विजय

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

लांजा

‘आपले सरकार’च्या ऑनलाइन सेवेत लांजाचा झेंडा; पोलीस अंमलदार नितेश राणे राज्यात अव्वल

1 Min Read
लांजा

लांजा शहरात बंद घरांना लक्ष्य करत चोरांचा सुळसुळाट; मौल्यवान ऐवज आणि रोकड लंपास झाल्याने नागरिकांमध्ये घबराट, रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी

1 Min Read
लांजा

लांजा: कर्जाच्या विळख्यातून वृद्धेचा खून करणाऱ्या दूध विक्रेत्याला सात दिवसांची पोलीस कोठडी

2 Min Read
लांजा

लांजा: गोळवशीच्या स्वरा जोगळेची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड; ग्रामस्थांकडून सत्कार

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?