ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय संघ पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत; कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४-३ ने विजय
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय संघ पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत; कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४-३ ने विजय
देश-विदेश

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय संघ पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत; कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४-३ ने विजय

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 8:36 am
Gramin Varta
12 Views
Share

दिल्ली: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुषांच्या हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत, गतविजेत्या भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-३ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.सामन्याच्या सुरुवातीला भारताचे वर्चस्व दिसून आले आणि पहिल्या क्वार्टरमध्येच भारताने २-० अशी आघाडी घेतली.

कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन पेनल्टी कॉर्नर्सचे रूपांतर शक्तिशाली ‘ड्रॅग-फ्लिक्स’द्वारे गोलमध्ये केले.

पाकिस्तानने आक्रमक सुरुवात केली आणि तिसऱ्या मिनिटाला त्यांना पहिला ‘शॉट ऑन टार्गेट’ मिळाला, परंतु गोलरक्षक सूरज करकेरा याने तो बचावला. त्यानंतर चौथ्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. अनेक संधी निर्माण झाल्यानंतर, पाचव्या मिनिटाला हरमनप्रीतने अली रेझाच्या पायांमधून चेंडू जाळीत धाडून भारताचे खाते उघडले. १३ व्या मिनिटाला भारताने आपली आघाडी दुप्पट केली. हरमनप्रीतने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर शक्तिशाली ‘ड्रॅग-फ्लिक’ मारला आणि चेंडू गोलपोस्टवरील बचावपटू व ‘रशर’च्या मधून वेगाने व जमिनीलगत गोलजाळीत धाडला.

पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस पाकिस्तानला अनेक पेनल्टी कॉर्नर्स मिळाले, परंतु भारताने आपली आघाडी कायम राखली. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताचे वर्चस्व कायम राहिले आणि २४ व्या मिनिटाला त्यांनी आघाडी वाढवली. शिलानंदने डावीकडून धावत जाऊन पास दिला आणि मध्यभागी असलेल्या सुखजीत सिंगने चेंडूची दिशा बदलून गोल केला. २९ व्या मिनिटाला पाकिस्तानने एक गोल परत केला. अबू बकरचा ‘ड्रॅग-फ्लिक’ मोहितला लागला आणि चेंडू गोलमध्ये गेला, ज्यामुळे मध्यांतरापर्यंत भारताची आघाडी ३-१ अशी झाली.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचे वर्चस्व राहिले, परंतु त्यांना आणखी गोल करता आले नाहीत. मात्र, या सत्राच्या अखेरीस पाकिस्तानने जोरदार पुनरागमन केले. ४४ व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगला ‘ग्रीन कार्ड’ दाखवण्यात आले. पाकिस्तानने याचा लाभ घेतला आणि हनान शाहिदने गोल करून हे अंतर 3-2 ने कमी केले. चौथ्या सत्रातील ४९ व्या मिनिटाला पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केले. उजवीकडून ‘सर्कल’मध्ये प्रवेश केल्यानंतर वाहीद राणाने गोल करत ३-३ ने बरोबरी साधली. सामना बरोबरीत असताना दोन्ही संघांनी निर्णायक गोलसाठी प्रयत्न केले. ५४ व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण सुफियानचा ‘ड्रॅग-फ्लिक’ अमित रोहिदासने अडवला.

सामना संपायला साधारण ९० सेकंद बाकी असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण पाकिस्तानने या निर्णयाविरुद्ध यशस्वी ‘रिव्ह्यू’ घेतला आणि तो निर्णय फिरवला गेला; परिणामी भारताला ‘फ्री-हिट’ देण्यात आली. अखेरीस, केवळ ५० सेकंद बाकी असताना भारताने विजयी गोल नोंदवला. अभिषेकचा प्रयत्न सुरुवातीला गोलकीपरने रोखला आणि त्यानंतर आलेला ‘रिबाउंड’ही अडवण्यात आला, तरीही अखेरीस चेंडू पाकिस्तानच्या हॉकीपटूच्या हॉकी स्टिकला लागून दिशा बदलल्यामुळे भारताचा गोल झाला. आणि 4-3 ने निर्णायक आघाडी घेतली. त्यानंतर पाकिस्तानला पुन्हा बरोबरी साधता आली नाही. अशा प्रकारे भारताने हा रोमांचक उपांत्य सामना जिंकला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

Total Visitors :

5468408
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत बैलाने गिळली ३ तोळ्यांची सोनसाखळी

Gramin Varta
2 Min Read

केळवली, धावडेवाडी व माचाळ परिसरातील रस्त्यांची डागडुजीने ग्रामस्थांना मिळाला मोठा दिलासा

Gramin Varta
1 Min Read

राजकीय मतभेद विरघळले, हास्यरेषा जुळल्या; फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर

Gramin Varta
2 Min Read

सहदेव बेटकर यांच्या तत्पर पाठपुराव्यामुळे वादळात खंडित झालेला शेणवडेतील वीजपुरवठा पूर्ववत; तीन वाड्या प्रकाशमान

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत विरोधक आक्रमक राहणार – राहुल गांधी

3 Min Read
देश-विदेश

‘लहरा दो तिरंगा’ यात्रेपूर्वी अभिजीत दिपके आणि नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात

3 Min Read
देश-विदेश

राहुल गांधींसह १० विरोधी नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

4 Min Read
देश-विदेश

फटाक्यांवर पूर्ण बंदीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार; वेळेचे बंधन घालण्याचा विचार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?