ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी जिल्ह्यात संभाव्य दुष्काळाच्या सावटात ८५ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध; पशुपालकांना मोठा दिलासा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी जिल्ह्यात संभाव्य दुष्काळाच्या सावटात ८५ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध; पशुपालकांना मोठा दिलासा
गाव शिवार

रत्नागिरी जिल्ह्यात संभाव्य दुष्काळाच्या सावटात ८५ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध; पशुपालकांना मोठा दिलासा

Gramin Varta
Last updated: October 6, 2026 9:16 am
Gramin Varta
62 Views
Share

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात यंदा काही तालुके वगळता इतर भागात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पहिल्या ट्रिगरमध्ये तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या दुष्काळी पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे १ लाख ९६ हजार लहान-मोठ्या जनावरांच्या चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने युद्धपातळीवर नियोजन केले आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात तब्बल ८५ हजार ७१० मेट्रिक टन चारा उपलब्ध असून, मुबलक चारा आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे स्थानिक पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असताना, दुसरीकडे पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार नऊही तालुक्यांत अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पंचनामे करत आहेत.

संभाव्य दुष्काळात जनावरांचे हाल होऊ नयेत म्हणून चारा-पाण्याची व्यवस्था चोख ठेवावी आणि आवश्यक पडल्यास चारा छावण्या उभारण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डोंगराळ भाग, खरीप पिके आणि विशेष चारा पिकांच्या माध्यमातून जनावरांसाठी आवश्यक साठा तयार ठेवण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाने पूर्वी शेतकऱ्यांना केलेल्या चारा बियाणे वाटपामुळेही या साठ्यात मोलाची भर पडली आहे. चारा उत्पादनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) ३० लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीचा प्रस्ताव पाठवला असून, या निधीच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे; हा निधी उपलब्ध झाल्यास बियाणे वाटपाद्वारे शेतकऱ्यांना आणखी मोठी मदत करणे शक्य होणार आहे.

Total Visitors :

5468400
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

आंबोली धबधब्यावर पर्यटकांच्या अंगावर अचानक पडला साप; चिमुकला थोडक्यात बचावला

Gramin Varta
2 Min Read

दुष्काळग्रस्त बळीराजाला हेक्टरी ५० हजारांची तातडीची मदत द्या; भारतीय किसान संघाची दापोली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

Gramin Varta
2 Min Read

एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीसाठी शासनाकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर

Gramin Varta
2 Min Read

गणपतीपुळे मंदिरातील भाद्रपदी गणेशोत्सवाची महाप्रसादाने सांगता; सुमारे २१०० भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

गाव शिवार

कोकणातील दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाची नवी पशुधन विमा योजना; पशूंच्या सुरक्षेसाठी ८५ टक्के अनुदान

3 Min Read
गाव शिवार

ऐन दुष्काळी संकटात पशुपालकांना मोठा दिलासा; राज्यात प्रथमच ‘महाराष्ट्र वैरण विकास धोरण’ लागू

2 Min Read
गाव शिवार

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

1 Min Read
गाव शिवार

रत्नागिरी जिल्ह्यातील ९ हजार बागायतदारांच्या खात्यात ३० कोटींचा पीकविमा जमा; हवामान बदलाच्या फटक्यानंतर शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?