ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गणपतीपुळे मंदिरातील भाद्रपदी गणेशोत्सवाची महाप्रसादाने सांगता; सुमारे २१०० भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गणपतीपुळे मंदिरातील भाद्रपदी गणेशोत्सवाची महाप्रसादाने सांगता; सुमारे २१०० भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
रत्नागिरी

गणपतीपुळे मंदिरातील भाद्रपदी गणेशोत्सवाची महाप्रसादाने सांगता; सुमारे २१०० भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 6:43 pm
Gramin Varta
105 Views
Share

गणपतीपुळे / वैभव पवार : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भाद्रपदी गणेशोत्सवाची सांगता बुधवारी वामन द्वादशीच्या पवित्र दिनी महाप्रसादाने भक्तिमय वातावरणात करण्यात आली. या महाप्रसादाचा सुमारे २१०० भाविकांनी लाभ घेतला. यामध्ये स्थानिक ग्रामस्थांसह विविध भागांतून गणपतीपुळ्यात दाखल झालेल्या भाविक आणि पर्यटकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाच्या कालावधीत श्रींची महापूजा, दररोज आरती, मंत्रपुष्प तसेच सुश्राव्य कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी श्रींची पालखी मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावरून वाजतगाजत काढण्यात आली. भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या पालखी सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय झालेल्या या उत्सवाची बुधवारी वामन द्वादशीच्या दिवशी महाप्रसादाने सांगता झाली. सकाळपासूनच महाप्रसादासाठी भाविकांची वर्दळ सुरू होती. सुमारे २१०० भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत उत्सवाची सांगता भक्तिभावाने केली.

भाद्रपदी गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी देवस्थान समितीची पंच कमिटी, पुजारी, कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध सहकार्यामुळे संपूर्ण उत्सव सुरळीतपणे पार पडला.

Total Visitors :

5427502
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

१९ जिल्ह्यांत पाऊस लांबल्याने राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; पंचनाम्यांपूर्वीच बळीराजा हवालदिल

Gramin Varta
2 Min Read

नाटे बाजारपेठेतील टपरीत मटका जुगार; वृद्धावर पोलिसांची कारवाई, रोकड व साहित्य जप्त

Gramin Varta
1 Min Read

देवदर्शनानंतर मुंबईला परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात;चौघांचा जागीच मृत्यू, सात जखमी

Gramin Varta
2 Min Read

दुष्काळाचं संकट विचित्र; योजना, विकास प्रकल्पांचा निधी दुष्काळासाठी वापरावा – उद्धव ठाकरे

Gramin Varta
4 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मिरकरवाडा बंदरात मत्स्य विभागाची धडक कारवाई; विनावापर पडून असलेल्या ३० नौका हटवण्यास सुरुवात

2 Min Read
रत्नागिरी

राजीवडा समुद्रात महाकाय लाटेच्या तडाख्याने नौका उलटली; आठ मच्छीमार बचावले

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी एसटीच्या ताफ्यात १५० नव्या स्मार्ट बसेस दाखल होणार; खिळखिळ्या गाड्यांच्या जागी अत्याधुनिक जिजाऊ बसेस धावणार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी विमानतळ आयएलएससाठी घरे व मंदिरे पाडणार नाही; बाधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत दमण मॉडेलचा पर्याय तपासण्याचे आदेश

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?