ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: टेरव येथे मोबाईल टॉवरच्या कामासाठी विनापरवाना वीजवापर; महावितरणकडून ५९ हजारांचा दंड वसूल, वायरमनला कारणे दाखवा नोटीस
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » टेरव येथे मोबाईल टॉवरच्या कामासाठी विनापरवाना वीजवापर; महावितरणकडून ५९ हजारांचा दंड वसूल, वायरमनला कारणे दाखवा नोटीस
चिपळूण

टेरव येथे मोबाईल टॉवरच्या कामासाठी विनापरवाना वीजवापर; महावितरणकडून ५९ हजारांचा दंड वसूल, वायरमनला कारणे दाखवा नोटीस

Gramin Varta
Last updated: October 17, 2026 4:57 pm
Gramin Varta
142 Views
Share

चिपळूण: तालुक्यातील टेरव येथे ग्रामसभेचा तीव्र विरोध डावलून सुरू असलेल्या मोबाईल टॉवरच्या कामासाठी थेट महावितरणच्या विद्युत खांबावरून आकडा टाकून वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिपळूण महावितरणने तत्परतेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत संबंधित जागामालकाकडून सुमारे ५९ हजार रुपयांचा दंड गुरुवारी वसूल केला आहे. तसेच या वीजचोरी प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले टेरव येथील वायरमन श्री. मालप यांना महावितरणने कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

टेरव येथील संतोष विश्राम म्हालीम यांच्या मालकीच्या जागेत एका मोबाईल कंपनीच्या टॉवर उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, या कामाला स्थानिक ग्रामसभेने आधीच विरोध दर्शवला होता. ग्रामस्थांचा विरोध असतानाही हे काम सुरू ठेवण्यात आले आणि त्यासाठी महावितरणच्या विद्युत खांबावरून कोणतीही परवानगी न घेता थेट बेकायदेशीर वीजजोडणी करून विजेचा वापर केला जात होता. या गैरप्रकाराची माहिती मिळताच महावितरणच्या भरारी पथकाने दोन दिवसांपूर्वी संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान विनापरवाना वीज वापरल्याचे प्रत्यक्ष निदर्शनास येताच पथकाने वीजचोरी उघडकीस आणली.

या बेकायदेशीर कृत्याबद्दल महावितरणने जागामालकावर कारवाई करत ५९ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानुसार ही संपूर्ण रक्कम जागामालकाने गुरुवारी महावितरण कार्यालयात तातडीने जमा केली. दुसरीकडे, या अनधिकृत वीजजोडणी प्रकरणात स्थानिक वायरमन श्री. मालप यांच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांनी थेट महावितरण प्रशासनाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांनी मालप यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. ग्रामसभेचा विरोध आणि त्यातच उघडकीस आलेले हे वीजचोरीचे प्रकरण यामुळे सध्या टेरव परिसरात हा विषय प्रचंड चर्चेचा ठरला आहे.

Total Visitors :

5469384
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापुर : धोपेश्वर गुरववाडी येथे किरकोळ वादातून महिलेवर काठीने हल्ला

Gramin Varta
1 Min Read

आई-वडिलांबद्दलची कृतज्ञता समाजाला सकारात्मक दिशा देते : प.पू. स्वामी बाळ सत्यधारी महाराज

Gramin Varta
3 Min Read

इंडी आघाडीचा संसद ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा

Gramin Varta
3 Min Read

ग्रामीण स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना बळ देण्यासाठी ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’बाबत महत्त्वपूर्ण करार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण: तळसरमध्ये विहिरीत पडलेल्या सांबराला वन विभागाकडून जीवदान

1 Min Read
चिपळूण

सावर्डे येथे २४ ऑक्टोबरला ‘मिनी नाईट प्रोमो रन’चे आयोजन

2 Min Read
चिपळूण

चिपळूण पॉवर हाऊसजवळ भीषण अपघात; बाराचाकी ट्रकने आर्टिगा कारला पाठीमागून उडवले, दोघे जखमी

1 Min Read
चिपळूण

चिपळूण नगरपरिषदेच्या मटण व मच्छी मार्केट इमारतीचा होणार कायापालट; नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?