ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ग्रामीण स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना बळ देण्यासाठी ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’बाबत महत्त्वपूर्ण करार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ग्रामीण स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना बळ देण्यासाठी ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’बाबत महत्त्वपूर्ण करार
महाराष्ट्र

ग्रामीण स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना बळ देण्यासाठी ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’बाबत महत्त्वपूर्ण करार

Gramin Varta
Last updated: October 23, 2026 8:33 am
Gramin Varta
59 Views
Share

मुंबई: महाराष्ट्रातील तरुण नवोन्मेषक, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील स्टार्टअप्सना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत सहभाग वाढविण्यासाठी आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या (MACCIA) ‘गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल’ (GTUIC) यांच्यात हा द्विपक्षीय करार संपन्न झाला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या करारावर विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर आणि कौन्सिलचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील तळागाळातील नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञान-आधारित प्रभावी उपाय शोधणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. ग्रामीण व निम-शहरी भागातील गुणवान तरुणांच्या कल्पकतेला व्यावसायिक रूप देऊन राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे, आयटीआय आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना उद्योग जगताशी जोडले जाईल. निवडक नवकल्पनांना तज्ज्ञांमार्फत तांत्रिक साहाय्य, मार्गदर्शन आणि व्यासपीठ उपलब्ध करून देत तरुणांना केवळ नोकरी शोधणारे न ठेवता सक्षम उद्योजक घडविण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगत या भागीदारीमुळे राज्याच्या उद्योजकता परिसंस्थेला मोठी बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिलचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी भूमिका मांडताना स्पष्ट केले की, ग्रामीण भागातील युवक, महिला आणि कारागिरांकडे क्षमता असूनही भांडवल, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव असतो; ही दरी दूर करून रोजगार मागणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करणारी सक्षम पिढी घडविण्यासाठी संस्था राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये काम करत आहे. या स्पर्धेसाठी संस्थेचे पूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, शिवाजी मानकर, शिखर जैन, रामेश्वर पवार, सुरेश घोरपडे, अण्णासाहेब पाटील, दिवाकर केसकर, ॲड. रिचा पाठक, अक्षता भांबळे, विशाल बंडगर, जितु चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Total Visitors :

5468685
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

संगमेश्वर परिसरात गौरी-गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन; चाकरमान्यांच्या उपस्थितीने कोकण फुलले

Gramin Varta
2 Min Read

मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; महाडजवळ दीड कोटींची गोवा बनावटीची व्हिस्की जप्त, ट्रकसह चालकाला बेड्या

Gramin Varta
2 Min Read

सुहेल मुकादम यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर व सायबर जनजागृती उपक्रम संपन्न

Gramin Varta
2 Min Read

गुहागर: दुसरीतील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला जन्मठेप

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

‘लेक लाडकी’ योजनेच्या नियमांत महत्त्वपूर्ण सुधारणा; आता महाडीबीटी २.० पोर्टलवरून थेट अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध

2 Min Read
महाराष्ट्र

कर्तव्यावर प्राणाची बाजी लावणाऱ्या पोलिसांना मिळणार ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’

2 Min Read
महाराष्ट्र

पुण्यात हुंड्यासाठी २३ वर्षीय आयटी इंजिनिअर विवाहितेचा अंत; सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या, पतीसह सासू-सासऱ्याला बेड्या

3 Min Read
महाराष्ट्र

अंडर-१९ आशिया चषक : भारताचा नेपाळवर १० गडी राखून दणदणीत विजय

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?