ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पुण्यात हुंड्यासाठी २३ वर्षीय आयटी इंजिनिअर विवाहितेचा अंत; सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या, पतीसह सासू-सासऱ्याला बेड्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पुण्यात हुंड्यासाठी २३ वर्षीय आयटी इंजिनिअर विवाहितेचा अंत; सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या, पतीसह सासू-सासऱ्याला बेड्या
महाराष्ट्र

पुण्यात हुंड्यासाठी २३ वर्षीय आयटी इंजिनिअर विवाहितेचा अंत; सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या, पतीसह सासू-सासऱ्याला बेड्या

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 8:23 am
Gramin Varta
134 Views
Share

पुणे : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा हुंडाबळीची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली असून, चारचाकी गाडीसाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीवरून झालेल्या छळाला कंटाळून २३ वर्षीय आयटी अभियंता विवाहितेने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. वैष्णवी प्रवीण जरांडे (वय २३) असे मृत तरुणीचे नाव असून, या धक्कादायक प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तत्पर कारवाई करत तिचा पती ओंकार संजय घिसरे याच्यासह सासू आणि सासऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. वैष्णवीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या तिघांविरुद्ध हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचा विवाह ९ मे २०२६ रोजी उंड्री परिसरातील वडाचीवाडी येथील ओंकार घिसरे याच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता. मुलीच्या सुखासाठी माहेरच्या कुटुंबीयांनी लग्नात तब्बल ४० ते ४५ लाख रुपयांचा खर्च केला होता, तसेच १० तोळे सोने आणि जावयाच्या मागणीनुसार दुचाकीही घेऊन दिली होती. बंगळुरू येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेली वैष्णवी लग्नानंतर अवघे २३ दिवस सासरी राहून नोकरीनिमित्त बंगळुरूला गेली होती. त्यानंतर जून अखेरीस ती पुन्हा पुण्यात सासरी परतली आणि वर्क फ्रॉम होम पद्धतीने घरातूनच काम करू लागली. मात्र सासरच्या मंडळींची हाव एवढ्यावरच संपली नव्हती. पती ओंकारने १० जून रोजी वैष्णवीच्या वडिलांना फोन करून चारचाकी कार खरेदीसाठी ५ लाख रुपयांची रोकड किंवा नवी गाडी घेऊन देण्याची मागणी केली. लग्नात आधीच मोठा खर्च झाल्याने वडिलांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली; यानंतर माहेरहून पैसे उकळण्यासाठी वैष्णवीचा अमानुष छळ सुरू झाला. फिर्यादीनुसार वैष्णवी गर्भवती असतानाही तिचा छळ थांबला नाही; तिला सकाळी साडेसात ते रात्री आठ अशी हिंजवडीतील कंपनीत जाऊन येऊन नोकरी सांभाळत सासरची सर्व कामे करावी लागत होती.

दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी रात्री वैष्णवीने तिच्या आईला फोन करून सासरी होत असलेल्या असह्य त्रासाची माहिती दिली होती. त्यानंतर त्याच रात्री सुमारे साडेअकरा वाजता पती ओंकारने तिच्या माहेरी फोन लावून, “तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, नाहीतर माझ्याकडून काहीतरी बरेवाईट होईल,” अशी थेट धमकी दिली. या धमकीनंतर अवघ्या काही तासांतच, २५ सप्टेंबरच्या पहाटे वैष्णवीची प्रकृती गंभीर असल्याचा निरोप माहेरच्यांना देण्यात आला. आई-वडील तातडीने उंड्री येथील सासरी पोहोचले असता, वैष्णवीचा मृतदेह जमिनीवर गोधडीने झाकलेल्या संशयास्पद अवस्थेत आढळून आला. तिने पंख्याला गळफास घेतल्याचा दावा सासरच्यांनी केला असला, तरी या मृत्यूमागील घटनाक्रमावर माहेरच्यांनी गंभीर संशय व्यक्त केला आहे. काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता उंड्रीतील या घटनेमुळे पुण्यात वाढत्या हुंडाबळीच्या घटनांवरून नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत असून, काळेपडळ पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमसाठी ‘चलो दिल्ली’; १ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन

Gramin Varta
4 Min Read

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Gramin Varta
2 Min Read

किल्ले रायगड रोपवे सेवा तात्पुरती ठप्प; प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त

Gramin Varta
2 Min Read

‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरी पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी धडक; १६ गुन्हे दाखल करत २२ जणांना ठोकल्या बेड्या

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दीड लाख राजपत्रित अधिकारी सरसावले; एक दिवसाचे वेतन देणार ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला

2 Min Read
महाराष्ट्र

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मराठी साहित्य संमेलन- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

3 Min Read
महाराष्ट्र

महामार्गांवर ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना जीवनदान देण्यासाठी परिवहन विभागाचा पुढाकार; अपघातप्रवण पट्ट्यांत १०० नव्या रुग्णवाहिका तैनात होणार

2 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये ८.५७ लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक; २.९१ लाख रोजगारांची संधी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?