ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कोकणातील दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाची नवी पशुधन विमा योजना; पशूंच्या सुरक्षेसाठी ८५ टक्के अनुदान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कोकणातील दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाची नवी पशुधन विमा योजना; पशूंच्या सुरक्षेसाठी ८५ टक्के अनुदान
गाव शिवार

कोकणातील दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाची नवी पशुधन विमा योजना; पशूंच्या सुरक्षेसाठी ८५ टक्के अनुदान

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 8:27 am
Gramin Varta
39 Views
Share

चिपळूण: कोकणात गेल्या काही वर्षांपासून दुग्ध व्यवसायाला आलेली मरगळ दूर करून येथील पशुधनाला पुन्हा ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत विशेष पशुधन विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पशुवैद्यकीय विभागासह स्थानिक पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीही जनजागृतीसाठी सक्रिय झाल्या आहेत. गेल्या काही काळापासून कोकणातील अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणींमुळे पशुपालन पूर्णपणे बंद करून इतर व्यवसायांकडे मोर्चा वळवला आहे. परिणामी गावागावांत तसेच शहरांच्या रस्त्यांवर देशी व दुधाळ मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, जनावरांचे योग्य संगोपन न झाल्याने कोकणातील दुधाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चालल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे.

दुसऱ्या बाजूला तालुक्यातील शासकीय दूध डेअऱ्या बंद पडल्याने त्यांची कोट्यवधींची मालमत्ता आज पडीक व निकामी अवस्थेत धूळ खात पडून आहे. अशा विपरित परिस्थितीत काही भागात खासगी दूध डेअऱ्या नव्याने उभ्या राहत असल्या, तरी स्थानिक पातळीवर दर्जेदार पशुधन पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने दुधाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. अनेक होतकरू शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन गीर, लाल कंधारी आणि साहिवाल यांसारखी महागडी व दुभती जनावरे विकत आणून मोठ्या उमेदीने व्यवसाय सुरू केला होता; परंतु योग्य देखभालीचा अभाव, अचानक उद्भवणारी रोगराई आणि जनावरांचा अनपेक्षित मृत्यू यामुळे अनेक पशुपालक आर्थिक संकटात सापडून त्यांना व्यवसायात अपयशाला सामोरे जावे लागले आहे.

पशुपालकांचे हेच आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना शाश्वत दिलासा देण्यासाठी ‘पशुधनाला विमा संरक्षण, पशुपालकांच्या आर्थिक सुरक्षिततेची हमी’ या ब्रीदवाक्याखाली शासनाने ही विमा योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत दुग्ध गाय, दुग्ध म्हैस, बैल, रेडा, शेळी व मेंढी या पशुधनाला एक, दोन आणि तीन वर्षांसाठी सर्वसमावेशक विमा संरक्षण कवच दिले जाणार आहे. यासाठी एका वर्षासाठी ३ हजार रुपये, दोन वर्षांसाठी सरासरी ६ हजार रुपये आणि तीन वर्षांसाठी सरासरी ८ हजार रुपये असा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केंद्र व राज्य शासनाकडून या विमा हप्त्यावर तब्बल ८५ टक्के भरीव अनुदान दिले जाणार असून, लाभार्थी शेतकऱ्याला विम्याच्या हप्त्याचा केवळ १५ टक्के एवढाच नाममात्र हिस्सा भरावा लागणार आहे. या योजनेमुळे जनावरांचा अनपेक्षित मृत्यू, साथीचे आजार तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या आर्थिक हानीपासून पशुपालकांना पूर्ण संरक्षण मिळणार असून, कोकणातील बंद पडत चाललेल्या दुग्ध व्यवसायाला यातून मोठे स्थैर्य लाभण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Total Visitors :

5468676
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांत डिसेंबरनंतर चारा छावण्यांची उभारणी; थेट अनुदान व डेपोचे पर्याय वगळून प्रशासकीय पातळीवर शिक्कामोर्तब

Gramin Varta
2 Min Read

नाझीमा रमजान गोलंदाज यांना भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्थेचा ‘अरुणा पुरस्कार’ जाहीर

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी: घाम गाळून पिकवलेली स्वप्नं दुष्काळाने गिळली; उरल्या फक्त रिकाम्या लोंब्या, अखेर डोळ्यांत अश्रू साठवून बळीराजाने स्वतःच्याच भातावर चालवला ग्रासकटर!

Gramin Varta
2 Min Read

बिगरकृषी वीजग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना’; संपूर्ण व्याज व विलंब आकार माफ, मूळ थकबाकीतही २० टक्क्यांपर्यंत सवलत

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

गाव शिवार

रत्नागिरी जिल्ह्यातील ९ हजार बागायतदारांच्या खात्यात ३० कोटींचा पीकविमा जमा; हवामान बदलाच्या फटक्यानंतर शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा

2 Min Read
गाव शिवार

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

1 Min Read
गाव शिवार

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या संरक्षणासाठी मोलाचा सल्ला

2 Min Read
गाव शिवार

रत्नागिरी जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू; आंब्याचा हप्ता कमी होऊन संरक्षण कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?