ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू; आंब्याचा हप्ता कमी होऊन संरक्षण कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू; आंब्याचा हप्ता कमी होऊन संरक्षण कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला
गाव शिवार

रत्नागिरी जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू; आंब्याचा हप्ता कमी होऊन संरक्षण कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला

Gramin Varta
Last updated: October 6, 2026 8:59 am
Gramin Varta
158 Views
Share

रत्नागिरी: बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादनात होणारी घट आणि त्यामुळे बागायतदारांना सोसावे लागणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत जिल्ह्यात सन २०२६-२७ या वर्षासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू, नारळ आणि सुपारी या चार प्रमुख फळपिकांना या योजनेतून भक्कम आर्थिक संरक्षण मिळणार असून, बागायतदारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने विमा हप्ता भरून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व कृषी विभागाने शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे यावर्षी विशेषतः आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आंब्याचा संरक्षण कालावधी १५ मे ऐवजी आता थेट ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे, तर शेतकऱ्यांचा विमा हप्ता हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांवरून थेट ८ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

जिल्ह्यात बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविली जात असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांना यात सहभागी होता येणार आहे. योजनेअंतर्गत आंबा पिकासाठी हेक्टरी १ लाख ७० हजार रुपयांच्या संरक्षित रकमेसाठी ८ हजार ५०० रुपये हप्ता, काजूसाठी १ लाख २० हजार रुपयांच्या संरक्षित रकमेसाठी ६ हजार रुपये हप्ता, नारळासाठी १ लाख ७० हजार रुपयांच्या संरक्षित रकमेसाठी ८ हजार ५०० रुपये हप्ता, तर सुपारी पिकासाठी १ लाख रुपयांच्या संरक्षित रकमेसाठी ५ हजार रुपये इतका प्रति हेक्टरी शेतकरी हप्ता निश्चित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अधिसूचित ८३ महसूल मंडळांमध्ये आंबा व काजूसाठी, ५३ मंडळांमध्ये नारळासाठी आणि २३ महसूल मंडळांमध्ये सुपारीसाठी हे संरक्षण लागू राहील. अधिसूचित हवामान केंद्रांवर नोंदवले जाणारे कमाल व किमान तापमान, पाऊस, हवेतील आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग हे घटक निर्धारित निकषांपेक्षा प्रतिकूल ठरल्यास शेतकऱ्यांना थेट नुकसानभरपाई दिली जाणार आहे.

या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे ‘ॲग्रीस्टॅक’ अंतर्गत फार्मर आयडी असणे आणि ‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपद्वारे संबंधित फळपिकाची नोंद केलेली असणे बंधनकारक आहे. शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र, बँक अथवा अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाइन हप्ता भरू शकणार असून, अर्जासोबत फळबागेचा जिओ-टॅगिंग असलेला फोटो अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नारळ व सुपारी पिकांसाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ ही असून आंबा व काजूसाठी ३० नोव्हेंबर २०२६ ही अंतिम तारीख आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रतिकेश शिगवण (९८८१९६७२३३) यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Total Visitors :

5468400
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सावर्डे येथे जन आरोग्य समितीची बैठक संपन्न; चाकरमान्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर

Gramin Varta
2 Min Read

विद्यार्थी समाजविघातक नाहीत; विश्वास पुन्हा मिळवा – हायकोर्ट

Gramin Varta
3 Min Read

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघ जाहीर, भुवनेश्वर कुमारचे चार वर्षांनंतर पुनरागमन

Gramin Varta
3 Min Read

आंजणारी दुर्घटनेतील ‘त्या’ खोट्या कॉलचे गूढ कायम; तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

गाव शिवार

ऐन दुष्काळी संकटात पशुपालकांना मोठा दिलासा; राज्यात प्रथमच ‘महाराष्ट्र वैरण विकास धोरण’ लागू

2 Min Read
गाव शिवार

कोकणातील दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाची नवी पशुधन विमा योजना; पशूंच्या सुरक्षेसाठी ८५ टक्के अनुदान

3 Min Read
गाव शिवार

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

1 Min Read
गाव शिवार

रत्नागिरी जिल्ह्यातील ९ हजार बागायतदारांच्या खात्यात ३० कोटींचा पीकविमा जमा; हवामान बदलाच्या फटक्यानंतर शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?