ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ब्रेकिंग : दाभोळजवळ शिकारीदरम्यान गावठी बंदुकीतून मिसफायर; एकाचा जागीच मृत्यू, तर दुसरा जखमी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ब्रेकिंग : दाभोळजवळ शिकारीदरम्यान गावठी बंदुकीतून मिसफायर; एकाचा जागीच मृत्यू, तर दुसरा जखमी
दापोली

ब्रेकिंग : दाभोळजवळ शिकारीदरम्यान गावठी बंदुकीतून मिसफायर; एकाचा जागीच मृत्यू, तर दुसरा जखमी

Gramin Varta
Last updated: October 1, 2026 10:09 am
Gramin Varta
1.1k Views
Share

दाभोळ: दापोली तालुक्यातील दाभोळजवळील वणौशी-खोंडारण परिसरात ३० सप्टेंबरच्या रात्री शिकारीसाठी गेलेल्या दोघांवर काळाने घाला घातला. शिकारीदरम्यान गावठी बनावटीच्या बंदुकीतून अचानक मिसफायर होऊन लागलेल्या गोळ्यांच्या छर्र्यांमुळे एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेत सचिन शांताराम शिगवण (वय ४४, रा. खोंडारण खालचीवाडी) यांचा मृत्यू झाला असून, सुनील पांध्ये (वय ४८) हे जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण खोंडारण आणि दाभोळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शिगवण आणि सुनील पांध्ये हे दोघे मंगळवारी रात्रीच्या सुमारास वणौशी-खोंडारण परिसरातील जंगलात शिकारीसाठी गेले होते. शिकारीचा शोध सुरू असतानाच त्यांच्याकडील गावठी बंदुकीतून अनपेक्षितपणे गोळी सुटली. या मिसफायरमध्ये सचिन शिगवण यांच्या पोटात आणि पोटाच्या खालच्या भागात अंदाजे चार ते पाच छर्रे घुसल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. याच वेळी जवळच उभे असलेले सुनील पांध्ये यांच्याही मांडीला दोन ते तीन छर्रे लागल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जखमी सुनील पांध्ये यांना तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच दाभोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली. पोलिसांनी घटनास्थळावरून आवश्यक पुरावे ताब्यात घेतले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत ही घटना बंदुकीचा मिसफायर झाल्यामुळेच घडल्याचे समोर येत असले, तरी गोळीबार नेमका कसा झाला, शस्त्र कोणाचे होते आणि ते अधिकृत होते का, या सर्व बाबींचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत.

दरम्यान, ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर शिकारी आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या असुरक्षित गावठी बनावटीच्या शस्त्रांचा गंभीर प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Total Visitors :

5435597
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० वर संपर्क साधण्याचे सायबर पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांचे आवाहन

Gramin Varta
3 Min Read

जयगड मार्गावर खड्डा चुकवताना भीषण अपघातात दोघे जखमी, चालकावर ४ महिन्यांनी गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

राजीवडा समुद्रात महाकाय लाटेच्या तडाख्याने नौका उलटली; आठ मच्छीमार बचावले

Gramin Varta
2 Min Read

गुहागर: ऐन गणेशोत्सवात पालशेत-जोईलवाडीत पाणीटंचाई; महिला वर्गाची हंडा-डोक्यावरून पायपीट

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

दापोली

दापोली चॅम्पियन लीगच्या पहिल्या हंगामावर ‘आय के स्पोर्ट्स’चा कब्जा; ‘बीटीएफ स्टुडिओ’चा ३-० ने पराभव

2 Min Read
दापोली

दापोलीत घरकाम करणाऱ्या महिलेकडून  सोन्या-चांदीचे दागिने लंपास

2 Min Read
दापोली

दापोलीतील एक दिवसाच्या नवजात बालकाचा डेरवण येथे उपचारादरम्यान मृत्यू

1 Min Read
दापोली

रिचार्जमध्ये ‘डेटा’चा भार कमी होणार आता फक्त कॉलिंगसाठी स्वतंत्र रिचार्ज

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?