रत्नागिरी : शहर ज्येष्ठ नागरिक संघाचा ज्येष्ठ नागरिक दिन १ ऑक्टोबरला साजरा होणार आहे.रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ दरवर्षी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करतो.
या वर्षी गुरुवार, दिनांक १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता संघाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी वयाची ७५, ८०, ८५, ९० व ९५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा तसेच वैवाहिक सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या सभासद दाम्पत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला संघाच्या सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी केले आहे.
रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचा उद्या ज्येष्ठ नागरिक दिन
Leave a Comment






