ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जागतिक तापमानवाढीत २०२६ हे वर्ष ठरले सर्वाधिक उष्ण; भारतातील १४.६५ कोटी नागरिकांना बसला तीव्र उष्णतेच्या लाटेचा तडाखा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जागतिक तापमानवाढीत २०२६ हे वर्ष ठरले सर्वाधिक उष्ण; भारतातील १४.६५ कोटी नागरिकांना बसला तीव्र उष्णतेच्या लाटेचा तडाखा
देश-विदेश

जागतिक तापमानवाढीत २०२६ हे वर्ष ठरले सर्वाधिक उष्ण; भारतातील १४.६५ कोटी नागरिकांना बसला तीव्र उष्णतेच्या लाटेचा तडाखा

Gramin Varta
Last updated: November 11, 2026 6:36 am
Gramin Varta
3 Views
Share

नवी दिल्ली: पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत चालल्याने २०२६ हे वर्ष आतापर्यंतच्या नोंदीतील जगातील चार सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत जागतिक सरासरी तापमान औद्योगिक युगापूर्वीच्या तुलनेत १.४७ अंश सेल्सिअसने अधिक नोंदवले गेले असून, जागतिक हवामान संघटनेच्या अहवालातून ही गंभीर माहिती पुढे आली आहे. १७५० च्या तुलनेत २०२५ मध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण तब्बल ५३ टक्क्यांनी वाढले असून, हरितगृह वायूंचे वाढते प्रमाण आणि एल निनोचा प्रभाव यामुळे या वर्षअखेरीस तसेच २०२७ मध्येही तापमानात मोठी वाढ होण्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.

या वाढत्या उष्णतेचा सर्वात तीव्र तडाखा भारताला बसला असून, एप्रिल २०२६ मध्ये धडकलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे देशातील सुमारे १४.६५ कोटी नागरिकांना थेट फटका बसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, युरोपमध्ये उष्णतेच्या लाटा, भीषण दुष्काळ आणि लागलेल्या वणव्यांमुळे ३० हजारांहून अधिक अतिरिक्त मृत्यू झाले आहेत. हवामान बदलाला सर्वात कमी जबाबदार असलेल्या असुरक्षित आणि गरीब देशांनाच या संकटाचा पहिला आणि सर्वाधिक फटका बसत असल्याची वस्तुस्थिती मांडत, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी हरितगृह वायूंचे उत्सर्जन वेगाने कमी करण्याचे तसेच जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व तातडीने टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे आवाहन जागतिक स्तरावर केले आहे.

दुसरीकडे, पृथ्वीवरील अतिरिक्त उष्णतेपैकी सुमारे ९० टक्के उष्णता समुद्र शोषून घेत असल्याने समुद्राच्या तापमानातही सातत्याने चिंताजनक वाढ नोंदवली जात आहे. त्यामुळे समुद्रातील उष्णतेची विक्रमी पातळी नोंदवले जाणारे २०२६ हे सलग दहावे वर्ष ठरण्याची शक्यता असून, जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धनासाठी कठोर आणि तातडीची पावले उचलण्याची निकड या अहवालाने अधोरेखित केली आहे.

Total Visitors :

5470245
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दिव्यांगत्वावर मात करत गरुडाच्या वेशात गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग

Gramin Varta
3 Min Read

साखरपा बसस्थानकात एसटीच्या चाकाखाली तरुण सापडला; पायावरून चाक गेले

Gramin Varta
1 Min Read

मिरकरवाडा जेटीवरील परप्रांतीय नौकांच्या मनमानी विरोधात स्थानिक मच्छीमार संतप्त

Gramin Varta
2 Min Read

देशात गाजलेल्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडात मुस्कान रस्तोगी आणि प्रियकर साहिल शुक्लाला फाशी; न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

दिल्लीच्या रस्त्यांवर प्रियंका गांधींचा आक्रमक पवित्रा; ‘इंदिरा इज बॅक’ची सोशल मीडियावर चर्चा!

6 Min Read
देश-विदेश

झोमॅटोचे ‘लिमिटलेस डिलिव्हरी’ फीचर लाँच; ग्राहकांना आता तब्बल ४० किमी अंतरावरून मागवता येणार आवडते पदार्थ

1 Min Read
देश-विदेश

‘अजिनी’ नौकेवरील २० इराणी खलाशांची सुटका; भारताच्या शौर्याचे इराणकडून कौतुक

2 Min Read
देश-विदेश

मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंधाची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?