ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दिव्यांगत्वावर मात करत गरुडाच्या वेशात गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दिव्यांगत्वावर मात करत गरुडाच्या वेशात गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग
रत्नागिरी

दिव्यांगत्वावर मात करत गरुडाच्या वेशात गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 8:36 am
Gramin Varta
32 Views
Share

रत्नागिरी : दिव्यांगत्वामुळे आयुष्य थांबत नाही, तर जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते, याचा प्रेरणादायी प्रत्यय नेवरे येथील ५६ वर्षीय मारुती गणपत ढेपसे यांनी दिला. दोन्ही पायांची ताकद गेल्यानंतरही खचून न जाता त्यांनी पुन्हा आपल्या व्यवसायाशी नाते जोडले. यंदाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत गरुडाची वेशभूषा करून इलेक्ट्रिक तीनचाकीवरून सहभागी होत त्यांनी उत्सवाचा आनंद घेतला. त्यांच्या या आगळ्या सहभागाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

नेवरे, ता. जि. रत्नागिरी येथील रहिवासी असलेल्या मारुती ढेपसे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. आई-वडील शेती करीत असताना दहावीनंतर त्यांनी कोतवडे येथे टू-व्हीलर रिपेअरिंग गॅरेज सुरू केले. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी व्यवसाय उभा केला. सन १९९८ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगी असून ती विवाहित आहे, तर मुलगा शुभम ढेपसे सध्या गॅरेजचा व्यवसाय सांभाळत आहे.

गॅरेजमध्ये काम करत असताना जड वस्तू उचलल्यामुळे सन २००४ पासून त्यांच्या उजव्या पायाची ताकद हळूहळू कमी होऊ लागली. सन २०१२ मध्ये लघवी करत असताना अचानक दोन्ही पायांतील ताकद पूर्णपणे गेली. कमरेखालील संवेदना कमी झाल्याने चालणे बंद झाले. तसेच लघवी आणि शौचावरील नियंत्रणही गेले. परिणामी दैनंदिन जीवनातील अनेक कामांसाठी त्यांना पत्नीवर अवलंबून राहावे लागले.

यानंतर त्यांनी मिरज येथे फिजिओथेरपीचे उपचार घेतले; मात्र अपेक्षित सुधारणा झाली नाही. सन २०१५ मध्ये आर.एच.पी. फाउंडेशन, रत्नागिरीचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली. तसेच मुंबईतील हाजी अली हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

पत्नीला सोबत घेऊन ढेपसे सुमारे पाच महिने मुंबईत उपचारासाठी राहिले. हाजी अली येथील उपचारादरम्यान त्यांना व्हीलचेअर मिळाली. व्हीलचेअरच्या मदतीने बाहेर पडणे, इतरांशी संवाद साधणे यामुळे त्यांच्या मानसिकतेतही सकारात्मक बदल झाला. उपचारादरम्यान त्यांनी बेडवरून व्हीलचेअरवर आणि व्हीलचेअरवरून कमोडवर स्वतःहून जाणे, अंघोळ करणे यांसह दैनंदिन कामे स्वबळावर करण्याचे कौशल्य आत्मसात केले. या प्रक्रियेत त्यांच्यात स्वावलंबनाचा आत्मविश्वास निर्माण झाला. दरम्यान, बेडसोरची समस्या निर्माण झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.

पाच महिन्यांनंतर घरी परतल्यानंतर त्यांनी हळूहळू व्हीलचेअरच्या सहाय्याने गॅरेजमध्ये जाण्यास सुरुवात केली. मुलगा शुभम व्यवसायाची जबाबदारी सांभाळू लागला, तर मारुती गॅरेजमधील कामकाजावर लक्ष ठेवू लागले. प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी पुन्हा व्यवसायाशी आपले नाते जोडले.

मात्र सतत व्हीलचेअरवर बसून राहिल्यामुळे सन २०२५ मध्ये सीटच्या भागात पुन्हा दोन बेडसोर झाले. दररोज ड्रेसिंग करूनही जखमा बऱ्या होत नसल्याने फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या सर्व अडचणींनंतरही त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन सोडला नाही.

यंदाच्या गणपती उत्सवात त्यांनी गरुडाची वेशभूषा करून इलेक्ट्रिक तीनचाकीवरून गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यांच्या या उत्साही सहभागामुळे मिरवणुकीत उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. दिव्यांगत्वाला मर्यादा न मानता उत्सवात सहभागी होण्याचा त्यांचा हा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.

अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी जिद्द, आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद कायम ठेवली, तर जीवनातील आनंदाचे क्षण आपल्या पद्धतीने अनुभवता येतात, हे मारुती ढेपसे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

Total Visitors :

5427562
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिमुकल्या मोदकांवर अवतरले साक्षात अष्टविनायक; विलास राहटे यांचा सूक्ष्म कलाविष्कार गणेशभक्तांच्या पसंतीस

Gramin Varta
2 Min Read

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात; कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल

Gramin Varta
1 Min Read

नीट पेपरफुटी प्रकरण: लातूरच्या मोटेगावकर कुटुंबाला जबर धक्का; आदित्य मोटेगावकरवर दोन वर्षांची कडक बंदी

Gramin Varta
2 Min Read

राज्यातील शाळांमध्ये २८ हजारांहून अधिक शिक्षकेतर पदे भरण्यास मंजुरी; नवीन नियम जाहीर

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

शेतकरी मदत केंद्र सुरू करून दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करा; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांचे आवाहन

1 Min Read
रत्नागिरी

अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाईचा बडगा; रत्नागिरीत मत्स्य विभागाची धडक कारवाई

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : ‘फर्टिलिटी टेस्ट ट्यूब सेंटर’च्या बॅटरी सेटअपमध्ये शॉर्ट सर्किट

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर एटीव्हीएम यंत्र दाखल; प्रवाशांची तिकीट खिडकीवरील लांबलचक रांगांमधून कायमची सुटका

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?