ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मनसे आयोजित पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मनसे आयोजित पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
रत्नागिरी

मनसे आयोजित पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

Gramin Varta
Last updated: October 26, 2026 10:07 am
Gramin Varta
52 Views
Share

रत्नागिरी: महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. निसर्गाचे रक्षण आणि पर्यावरणपूरक उत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या स्पर्धेत मावळंगे येथील अजय प्रकाश पारकर यांच्या दगडी चित्रकला सजावटीने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली.

स्पर्धेत सादर झालेल्या नावीन्यपूर्ण आणि कल्पक देखाव्यांमधून परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली. यामध्ये गावडे आंबेरे येथील रजनीश रामजी वासावे यांच्या केदारेश्वर मंदिर गुहा देखाव्याने द्वितीय, तर रत्नागिरी शहरातील विश्वनगर येथील श्रेयस अजित मयेकर यांच्या धूतपापेश्वर मंदिर देखाव्याने तृतीय क्रमांक संपादन केला. याशिवाय गोळप येथील सुतेज हरिश्चंद्र भाटकर यांच्या निसर्ग वाचवा या महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्याची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली.

पर्यावरणाचे संवर्धन करत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सर्व विजेत्यांचे तसेच स्पर्धेत उत्साहाने सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मनसे उपजिल्हाध्यक्ष तथा स्पर्धेचे आयोजक रूपेश जाधव यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. या उपक्रमातील सर्व विजेत्यांचा लवकरच एका विशेष पारितोषिक वितरण समारंभात गौरव करण्यात येणार असून, या कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती जाधव यांनी दिली आहे.

Total Visitors :

5469368
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची यशस्वी मोहोर

Gramin Varta
2 Min Read

नारायण राणे यांच्या खासदार निधीतून राजापूर तालुक्यात रस्त्यांसाठी ४० लाखांचा निधी मंजूर

Gramin Varta
1 Min Read

फडणवीसांना अंधारात ठेऊन प्लॅन आखला, एकनाथ शिंदेंचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता? – मनोज जरांगे

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा होणार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुकेही दुष्काळग्रस्त करण्यासाठी पाठपुरावा; १५ दिवसांत २ हजार बंधारे उभारणार : मंत्री उदय सामंत

3 Min Read
रत्नागिरी

अल निनोच्या तडाख्याने रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर दुष्काळाच्या छायेत, भातशेतीच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट

3 Min Read
रत्नागिरी

प्रतिकूल हवामानात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना निवाऱ्याचा आधार; रत्नागिरी दलाला ‘टेंट’ची सुविधा उपलब्ध

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात एफडीएची धडक मोहीम; बेकायदेशीर सुट्या मसाल्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत ८४ किलोचा साठा जप्त

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?