ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लावाने बोल्ड एन४ प्रो ५जी स्मार्टफोन केला लॉन्च
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लावाने बोल्ड एन४ प्रो ५जी स्मार्टफोन केला लॉन्च
महाराष्ट्र

लावाने बोल्ड एन४ प्रो ५जी स्मार्टफोन केला लॉन्च

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 2:42 pm
Gramin Varta
3 Views
Share

मुंबई: लावाने आपल्या ‘बोल्ड’ मालिकेत नवीन स्मार्टफोन ‘लावा बोल्ड एन४ प्रो ५जी’ लॉन्च केला आहे. ऑगस्टमध्ये लॉन्च झालेल्या ‘बोल्ड एन४ लाईट’चे हे अपग्रेडेड व्हर्जन आहे.

नव्या फोनमध्ये ५जी कनेक्टिव्हिटी, मोठी बॅटरी आणि सुधारित हार्डवेअर देण्यात आले असून, त्याची लॉन्च किंमत १३ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत कंपनीने दिलेल्या विविध ऑफर्सचा समावेश करून आहे.

लावा बोल्ड एन४ प्रो ५जीच्या मागील बाजूस फ्लॅट पॅनल देण्यात आले आहे. वरच्या डाव्या बाजूला गोल-आयताकृती आकाराचा कॅमेरा मॉड्यूल असून, त्यात दोन मोठे कॅमेरा लेन्स, एक छोटा गोलाकार घटक आणि एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. फोनचा फ्रेमदेखील फ्लॅट असून, उजव्या बाजूला पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे देण्यात आली आहेत. पुढील बाजूस सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ६.७५ इंचांची एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आली असून, ती १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोनमध्ये युनिसॉक टी८२०० ५जी चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यासोबत ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. तसेच ६ जीबी व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅमची क्षमता १२ जीबीपर्यंत वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड १६ आधारित ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फोनमध्ये क्लीन आणि स्मूद सॉफ्टवेअर अनुभव मिळणार आहे.

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा एआय ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी ६ हजार एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. मात्र, फोनच्या चार्जिंग स्पीडबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. धूळ आणि पाण्याच्या हलक्या संपर्कापासून संरक्षणासाठी फोनला आयपी६४ रेटिंग मिळाले आहे.

लावा बोल्ड एन४ प्रो ५जीचा सध्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला एकच व्हेरिएंट उपलब्ध करण्यात आला आहे. हा फोन २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. याशिवाय, लावाकडून ग्राहकांना घरपोच मोफत सर्व्हिस सपोर्ट देण्यात येणार आहे. फोनमध्ये काही बिघाड झाल्यास कंपनीकडून घरपोच दुरुस्तीची सुविधा दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Total Visitors :

5428503
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर एटीव्हीएम यंत्र दाखल; प्रवाशांची तिकीट खिडकीवरील लांबलचक रांगांमधून कायमची सुटका

Gramin Varta
2 Min Read

देशातील पहिल्या ‘स्पेस पार्क’साठी माचाळ,माथेरानची पाहणी; १८ महिन्यांत ५ उपग्रह सोडण्याचा राज्याचा मानस : उद्योगमंत्री उदय सामंत

Gramin Varta
3 Min Read

पावस येथील ‘कामावर जातो’ सांगून निघालेला २८ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत ७० वर्षीय महिला घरातून बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रला नवी बळकटी; राज्य कौशल्य विकास सोसायटी-सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

3 Min Read
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात ७० वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

2 Min Read
महाराष्ट्र

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंचा दुसरा अर्जही फेटाळला

3 Min Read
महाराष्ट्र

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?