ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: डॉक्टर मारहाण प्रकरण; नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, ३ दिवसांत शरण येण्याचे आदेश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » डॉक्टर मारहाण प्रकरण; नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, ३ दिवसांत शरण येण्याचे आदेश
महाराष्ट्र

डॉक्टर मारहाण प्रकरण; नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, ३ दिवसांत शरण येण्याचे आदेश

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 8:04 am
Gramin Varta
88 Views
Share

नवी दिल्ली : डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने म्हात्रे यांना मंजूर केलेला सशर्त जामीन सर्वोच्च न्यायालयाने थेट रद्द केला असून, पुढील तीन दिवसांच्या आत पोलिसांसमोर शरण येण्याचे कडक आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने राज्य सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप रमेश म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अटक झाल्यानंतर उच्च न्यायालयाने म्हात्रे यांच्यासह चार आरोपींना महाराष्ट्रात प्रवेशास बंदी आणि गोव्यात राहून स्थानिक पोलीस ठाण्यात नियमित हजेरी लावण्याच्या अटींवर जामीन दिला होता. या जाचक अटी शिथिल करण्याच्या मागणीसाठी म्हात्रे यांनी स्वतःहून सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली होती; मात्र सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारला जामीन रद्द करण्यासाठी अर्ज का केला नाही, अशी थेट विचारणा केली. त्यानंतर राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने म्हात्रे यांचा जामीनच रद्द ठरवला.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांच्या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त केली. राजकीय वजन असलेल्या व्यक्तींकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर आरोपी मोकाट फिरत राहण्याच्या प्रकारांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी परखड भूमिका खंडपीठाने मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या या कठोर निरीक्षणांमुळे कनिष्ठ न्यायालयातील खटल्यावर परिणाम होऊ शकतो, असा बचाव म्हात्रे यांच्या वकिलांनी केला; परंतु न्यायालयाने तो अमान्य करत निकाल दिला. जामिनाच्या अटी शिथिल करण्यासाठी गेलेल्या म्हात्रे यांना दिलासा मिळण्याऐवजी जामीन रद्द झाल्याने मोठा झटका बसला असून, तीन दिवसांत शरणागती पत्करून त्यांना पुन्हा न्यायालयीन कोठडीत जावे लागणार आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापूर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न

Gramin Varta
2 Min Read

श्रावण संपताच मिरकरवाडा बंदरात मासळी बाजाराला उधाण; ताज्या माशांच्या खरेदीसाठी खवय्यांची तुफान गर्दी

Gramin Varta
1 Min Read

गणेशोत्सवात साहिल आंबवकरने साकारला शिमगा आणि गणेशोत्सवाचा अनोखा देखावा

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीच्या आठवडा बाजारात अज्ञाताने काचा फोडून चारचाकी पेटवली

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

कोयना खोऱ्यात मध्यरात्री भूकंपाचे पाच सौम्य धक्के

2 Min Read
महाराष्ट्र

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

3 Min Read
महाराष्ट्र

भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल, २४ नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या

2 Min Read
महाराष्ट्र

अभ्यासाची स्वप्ने डोळ्यांत घेऊन निघाली, अन् वाटेतच डंपरखाली चिरडून १९ वर्षीय मुस्कानचा दुर्दैवी अंत

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?