ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मनोज जरांगेंनी दिलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल – मुख्यमंत्री
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मनोज जरांगेंनी दिलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल – मुख्यमंत्री
महाराष्ट्र

मनोज जरांगेंनी दिलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल – मुख्यमंत्री

Gramin Varta
Last updated: October 24, 2026 8:34 am
Gramin Varta
135 Views
Share

ऑडिओ क्लिपवरून शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे.

यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. अडीच वर्षांनंतर ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. यामागचे षडयंत्र काय? हे तपासले जाणार आहे. या ऑडिओ क्लिपचा पूर्णपणे तपास होईल. आम्हाला सर्वांना प्रश्न पडला आहे की, अडीच वर्षांनंतर ही ऑडिओ क्लिप बाहेर येण्यामागचा हेतू काय आहे? कुणाला टार्गेट केले जात आहे? कशासाठी केले जात आहे? या संदर्भात पूर्ण चौकशी करून सत्य आम्ही बाहेर काढू. या ऑडिओ क्लिपची संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत ही ऑडिओ क्लिप सर्वांना ऐकवून दाखवली होती.

राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची तपासणी एसआयटी करणार आहे. यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर सडकून टीका केली. फडणवीसांनी एसआयटीचा खेळ चालवला आहे. एसआयटी काय असते? तुमचाच ढोल आणि तुमच्याच दांडिया. आतापर्यंत फडणवीसांनी ११२ एसआयटी स्थापन केल्या. आल्यापासून ते फक्त एसआयटी स्थापन करत आहेत. फडणवीसांकडून एसआयटीचा खेळ चालला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप, शिंदेगट आणि अजित पवार गटाकडून पैशाचा खेळ कसा चालला आहे याचा स्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला.

दरम्यान जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आज रामदास कदम यांनी भाजप एकनाथ शिंदे यांचा केसाने गळा कापू पाहत आहे, असा आरोप करत प्रसाद लाड यांचे काही फोटो पत्रकार परिषदेत दाखवले. त्यानंतर भाजपने मोठी आक्रमक भूमिका घेत आता रामदास कदमांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. दुपारी प्रवीण दरेकरांनी सडेतोड उत्तर दिल्यानंतर आता भाजप नेते आणि मनोज जरांगेंचं उपोषण सोडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या प्रसाद लाड यांनी रामदास कदमांना आक्रमक शैलीमध्ये उत्तर दिलं आहे.

रामदास कदमांना फालतू काम बंद करावं. आम्ही महायुती म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मागे खंबीरपणे उभा होतो. महायुतीचं कर्तव्य काय आहे, हे तुम्ही सांगायची गरज नाही. तुम्ही ज्येष्ठ आहात, म्हणून शिंदे साहेब तुमचा आदर करतात. पण मागून तुम्ही याच शिंदे साहेबांबद्दल आणि त्यांच्या मुलाबद्दल काय बोलता याच्या क्लिपजर आम्ही उघड केल्या तर तुम्हाला तुमची जागा निश्चितपणे कळेलं, हे मी तुम्हाला सांगतो, असं म्हणत त्यांनी रामदास कदमांवर हल्लाबोल केला आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना या ऑडिओ क्लिपची माहिती दिली. मु्ख्यमंत्र्यांनी भूमिका घेत सायबर क्राइमला या क्लिपची चौकशी करण्यासाठी आदेश दिले आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर आरोप केले. प्रसाद लाड जरांगे पाटलांना भेटले वगैरै. भाजप एकनाथ शिंदेंचा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्याबरोबर जेवले, असे अनेक आरोप त्यांनी केले. मी त्या आरोपांचं खंडन करतो.

शिंदे साहेबांना एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आम्ही प्रामाणिकपणे एका मध्यस्थाची भूमिका पार पाडली. प्रत्येकवेळी आंदोलन मागे घ्यावं यासाठी प्रयत्न केला. अनेक नेते यामध्ये होते, विखे पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, उदय सामंत, मकरंद आबा यांनी हे प्रयत्न केले, पण जर रामदास कदम भाजपला बदनाम करणार असतील तर आम्ही हे सहन करणार नाही. शिंदे साहेबांनी त्यांना समज दिली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असं यावेळी प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

Total Visitors :

5468536
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

उपलब्ध शासकीय जमिनीचा मत्स्यव्यवसायासाठी परिणामकारक वापर करा – मंत्री नितेश राणे

Gramin Varta
3 Min Read

खेड: विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारले सुगंधी उटणे व आकाशकंदील; अस्तान नं. १ शाळेचा स्तुत्य उपक्रम

Gramin Varta
2 Min Read

बॉम्बच्या धमकीनंतर अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत मोठी वाढ; बुलेटप्रूफ काचेच्या कवचातून चाहत्यांशी संवाद

Gramin Varta
2 Min Read

लावाने बोल्ड एन४ प्रो ५जी स्मार्टफोन केला लॉन्च

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर समन्वयातून सकारात्मक निर्णयांची मालिका; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वपूर्ण ग्वाही

5 Min Read
महाराष्ट्र

‘नमो’चे चार हजार थकवून पाच हजारांच्या मदतीचा दिखावा; राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणावर शेतकरी संघटनांचा घणाघात

2 Min Read
महाराष्ट्र

एसआयआर प्रक्रिया रद्द करून नव्याने करा; बॅलेट पेपरसाठी सर्व पक्षांनी आंदोलन उभारावे – राज ठाकरे

2 Min Read
महाराष्ट्र

नवरात्र, दिवाळी, छठपूजेसाठी विशेष रेल्वेगाड्या; पुणे विभागातून २१६ फेऱ्या

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?