पुणे: नवरात्र, दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे रेल्वे विभागाने सात विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांच्या एकूण २१६ फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
पुणे, हडपसर आणि कोल्हापूर येथून उत्तर भारतासह विदर्भ आणि कर्नाटकातील विविध शहरांसाठी अतिरिक्त रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.’ट्रेन ऑन डिमांड’अंतर्गत या विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामध्ये हडपसर-गोरखपूर-हडपसर मार्गावर ६४ फेऱ्या, तर कोल्हापूर-कलबुर्गी-कोल्हापूर मार्गावर ६४ फेऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय हडपसर-गाझीपूर सिटी आणि नागपूर-हडपसर या मार्गांवरही आठवड्यातून दोनदा विशेष गाड्या धावणार आहेत.हडपसर-गोरखपूर विशेष गाडीच्या दोन्ही दिशांना प्रत्येकी ३२ फेऱ्या होणार आहेत. हडपसरहून गोरखपूरकडे जाणारी गाडी १६ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबरदरम्यान दररोज सकाळी ७.०५ वाजता सुटेल. परतीची गोरखपूर-हडपसर विशेष गाडी १७ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ५.३० वाजता गोरखपूरहून रवाना होईल.सणासुदीच्या काळात उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने या विशेष सेवांमुळे नियमित गाड्यांवरील प्रवासी भार कमी करण्यास मदत होणार आहे.
नवरात्र, दिवाळी, छठपूजेसाठी विशेष रेल्वेगाड्या; पुणे विभागातून २१६ फेऱ्या
Leave a Comment






