ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: उपलब्ध शासकीय जमिनीचा मत्स्यव्यवसायासाठी परिणामकारक वापर करा – मंत्री नितेश राणे
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » उपलब्ध शासकीय जमिनीचा मत्स्यव्यवसायासाठी परिणामकारक वापर करा – मंत्री नितेश राणे
महाराष्ट्र

उपलब्ध शासकीय जमिनीचा मत्स्यव्यवसायासाठी परिणामकारक वापर करा – मंत्री नितेश राणे

Gramin Varta
Last updated: October 13, 2026 8:24 am
Gramin Varta
58 Views
Share

वाशिष्ठीतील गाळ, राष्ट्रीय जलमार्ग व नव्या ड्रेजरच्या उपलब्धतेचा आढावा

मुंबई : कोकणात खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी स्वतंत्र मत्स्य बीज केंद्रे उभारण्याच्या प्रस्तावांना गती द्यावी. जलसंपदा महामंडळाच्या अखत्यारीतील जागेबाबत संबंधित स्तरावर पाठपुरावा करून सकारात्मक निर्णयानंतर महामंडळाच्या संचालक मंडळाचा ठराव सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.

आमदार शेखर निकम यांनी चिपळूण -वशिष्ठी खाडीतील गाळ काढणे आणि रत्नागिरीमध्ये शासकीय जागेवर मत्स्यबीज केंद्र उभारण्यासाठी उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी संबधित अधिका-यांना निर्देश दिले. कोकणात मोठ्या क्षमतेचे मत्स्य बीज केंद्र आवश्यक असून त्यासाठी प्रस्तावित दोन हेक्टर क्षेत्र अपुरे असल्याचे मत्स्य विभागाने स्पष्ट केले. अशा केंद्रासाठी किमान पाच हेक्टर, तर शक्य असल्यास आठ ते दहा हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे. खाडीलगत सुमारे ४० एकर शासकीय जमीन उपलब्ध असून तिचा खाऱ्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी उपयोग करता येऊ शकतो. रासायनिक घटकांचा संभाव्य परिणाम तपासण्यासाठी या जागेची तांत्रिक पाहणी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी कालव्यालगत जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जागेचा प्रस्ताव पुढे आला आहे. महामंडळाच्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी नियमानुसार ठराव आवश्यक असल्याने संबंधित प्रस्तावाचा पाठपुरावा करून तो संचालक मंडळासमोर ठेवावा. जमीन उपलब्ध झाल्यानंतर मत्स्य बीज केंद्राच्या कामाला सुरुवात करता येईल, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या पुढील टप्प्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. जलसंपदा विभागाने नदीपात्रात केलेल्या कामामुळे पूरस्थितीची तीव्रता कमी होण्यास मदत झाल्याचे आमदार शेखर निकम यांनी सांगितले. पण पुढील टप्प्यातील गाळ काढल्यास चिपळूणमध्ये पूर परिस्थिती उद्भवणार नाही. तसेच दाभोळ ते पेढे या राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक २८ मधील नौवहन मार्ग मोकळा केल्यास प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतुकीला चालना मिळेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

महाराष्ट्र सागरी मंडळाने आपल्या निर्धारित हद्दीतील नौवहन मार्ग खुला ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, पूरप्रतिबंधक उपाय म्हणून संपूर्ण गाळ काढण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाची आहे. वाळू उत्खननासाठी मिळालेली परवानगी आणि नदी अथवा खाडीतील गाळ काढण्याची परवानगी स्वतंत्र असून गाळ काढण्यासाठी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेने स्वतंत्र सीआरझेड परवानगी घ्यावी. त्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्यास ते देण्याची भूमिका मंडळाने मांडली.

पाण्याबाहेरील कोरड्या भागातील गाळ जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत काढता येईल. पण पाण्याखालील गाळासाठी अधिक खोलीपर्यंत काम करू शकणाऱ्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम ड्रेजरची आवश्यकता आहे. रत्नागिरी हा किनारी जिल्हा असल्याने आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नवीन ड्रेजर उपलब्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा, असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. ड्रेजर खरेदीपूर्वी त्याची कार्यक्षमता आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीतील उपयुक्तता तपासावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल दूरदृष्यप्रणालीद्वारे तर मत्स्य आयुक्त आणि जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

Total Visitors :

5468545
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

Gramin Varta
2 Min Read

राजकीय मतभेद विरघळले, हास्यरेषा जुळल्या; फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर

Gramin Varta
2 Min Read

ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यावसायिक जहाजावर हल्ला; ११ भारतीय जखमी, भारताकडून निषेध

Gramin Varta
2 Min Read

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

मुंबईत राममंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायूने दोघांचा मृत्यू

1 Min Read
महाराष्ट्र

दिशा सालियन प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरनंतर नवा कायदेशीर संघर्ष; सतीश सालियन थेट ‘मातोश्री’वर बजावणार मानहानीची नोटीस

3 Min Read
महाराष्ट्र

कोकणातील अतिरिक्त पाणी वळवणार मराठवाड्यात!

2 Min Read
महाराष्ट्र

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?