ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यावसायिक जहाजावर हल्ला; ११ भारतीय जखमी, भारताकडून निषेध
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यावसायिक जहाजावर हल्ला; ११ भारतीय जखमी, भारताकडून निषेध
देश-विदेश

ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यावसायिक जहाजावर हल्ला; ११ भारतीय जखमी, भारताकडून निषेध

Gramin Varta
Last updated: October 8, 2026 8:27 am
Gramin Varta
116 Views
Share

दिल्ली: इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या किनाऱ्याजवळ एका व्यावसायिक जहाजावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ११ भारतीय नागरिक जखमी झाले आहेत.मंगळवारी (६ ऑक्टोबर) भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध केला.जखमी भारतीय नागरिकांवर ओमानमधील खासाब येथे उपचार सुरू आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, “ओमानच्या किनाऱ्याजवळ पनामाचा ध्वज असलेल्या ‘एमटी ऑन पीस’ या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. हे जहाज स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून जात असताना एका प्रक्षेपकाच्या (हल्ल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूच्या) तडाख्याला बळी पडले.”

मंत्रालयाने पुढे सांगितले की, जहाजावरील एकूण १९ क्रू सदस्यांपैकी १७ जण भारतीय नागरिक आहेत. या हल्ल्यात १२ क्रू सदस्य जखमी झाले असून त्यापैकी ११ भारतीय नागरिक आहेत. ओमानच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने जखमी क्रू सदस्यांना जहाजातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर ओमानमधील खासाब येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या मदतीसाठी ओमानच्या अधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो.


परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, या भागात जहाजांवर सातत्याने होत असलेले हल्ले भारतासाठी गंभीर चिंतेचा विषय आहेत. या भागातील शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी असे हल्ले तातडीने थांबवण्याची आमची मागणी आम्ही पुन्हा एकदा अधोरेखित करतो.मंत्रालयाने पुढे सांगितले की, या भागातील व्यावसायिक जहाजे, नाविक आणि नागरिकांशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबवले पाहिजे. आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून जहाजांची वाहतूक आणि व्यापाराची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ववत केली पाहिजे.

दरम्यान, इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचा दावा आहे की, होर्मुझवर त्यांचे पूर्ण नियंत्रण आहे. तर इराणचा दावा आहे की, होर्मुझवर त्यांचा अधिकार असून त्याचे नियमनही इराणच करत आहे.

Total Visitors :

5469378
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील आडीवरे येथे रस्ता रुंदीकरण अथवा पर्यायी बायपास मार्गाची तातडीची गरज

Gramin Varta
3 Min Read

थकीत ई-चलानवर २० टक्के सवलत; वाहनचालकांना दिलासा देणारी राज्य सरकारची ‘अभय योजना’ जाहीर

Gramin Varta
2 Min Read

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी प्रसिद्ध; राज्यातील ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Gramin Varta
2 Min Read

कोयना खोऱ्यात मध्यरात्री भूकंपाचे पाच सौम्य धक्के

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

देशात गाजलेल्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडात मुस्कान रस्तोगी आणि प्रियकर साहिल शुक्लाला फाशी; न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

3 Min Read
देश-विदेश

ध्रुव राठींचा थेट रस्त्यावर उतरून पंतप्रधान मोदींसह ज्ञानेश कुमारांवर घणाघात

3 Min Read
देश-विदेश

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

3 Min Read
देश-विदेश

प्रधानमंत्री विकसित ग्राम स्वराज योजनेतून ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण; ७,३९५ कोटींची तरतूद

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?