ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘ज्ञानू मस्ट गो!’; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दीपकेंची थेट ‘जेलभरो’ आंदोलनाची घोषणा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘ज्ञानू मस्ट गो!’; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दीपकेंची थेट ‘जेलभरो’ आंदोलनाची घोषणा
महाराष्ट्र

‘ज्ञानू मस्ट गो!’; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दीपकेंची थेट ‘जेलभरो’ आंदोलनाची घोषणा

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 8:18 am
Gramin Varta
32 Views
Share

मुंबई : देशातील निवडणूक गैरव्यवहारांचे कथित सूत्रधार असल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आक्रमक पवित्रा घेत थेट दंड थोपाटले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी पदाचा राजीनामा न दिल्यास येत्या २ ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाचे नेते अभिजीत दीपके यांनी आधीच दिला होता. मात्र, या नियोजित आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने वातावरण अधिकच तापले आहे. पोलिसांच्या नकारानंतर मागे न हटता दीपके यांनी थेट ‘एक्स’वर अवघ्या दोन ओळींचा मेसेज पोस्ट करत, २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानात दुपारी ४ वाजता थेट ‘जेलभरो’ आंदोलन करण्याची मोठी घोषणा केली आहे.

“ज्ञानू, मस्ट गो… जावंच लागेल!” अशा दोन ओळींच्या रोखठोक ट्विटसह ‘#SaveDemocracy’ असा हॅशटॅग वापरत दीपके यांनी आंदोलनाची तारीख, वेळ, ठिकाण आणि स्वरूप जाहीर केले आहे. परवानगी नाकारल्यानंतर बॅकफूटवर जाण्याऐवजी थेट जेलभरोचा एल्गार पुकारल्याने केवळ मुख्य निवडणूक आयुक्तच नव्हे, तर मुंबई पोलीस आणि केंद्र सरकारच्या अडचणीतही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे २ ऑक्टोबरच्या आधी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासंदर्भात काही घडामोडी घडतात का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा खिळल्या आहेत.

दुसरीकडे, याच मुद्द्यावरून राजकीय पटलावर मोठी खळबळ उडाली असून ठाकरे बंधूंनीही मुंबईत एका भव्य महामोर्चाचे आयोजन केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या महामोर्चामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः प्रत्यक्ष सहभागी होणार असून अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे बंधूंनी केले आहे. हा महामोर्चा कुठून कुठे निघेल आणि त्याची नेमकी वेळ काय असेल, याची सविस्तर माहिती राज ठाकरे लवकरच जाहीर करणार आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे जेलभरो आंदोलन आणि ठाकरे बंधूंचा नियोजित महामोर्चा यामुळे आगामी दिवसांत मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापणार असून संपूर्ण देशाचे लक्ष या आंदोलनांकडे लागले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गणपतीपुळे मंदिरातील भाद्रपदी गणेशोत्सवाची महाप्रसादाने सांगता; सुमारे २१०० भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Gramin Varta
1 Min Read

‘सेवा संकल्प अभियाना’ने तीन वर्षांच्या चिमुरडीला दिले नवे आयुष्य; दुभंगलेले ओठ आणि टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

Gramin Varta
2 Min Read

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल

Gramin Varta
2 Min Read

Discovering the Next Wave of Game-Changing Startups

You Might Also Like

महाराष्ट्र

‘लाडकी बहीण’साठी सामाजिक न्याय विभागाकडून आणखी ३३९ कोटींचा निधी वितरित; राखीव निधी वळवल्याने विरोधकांचा आक्षेप

2 Min Read
महाराष्ट्र

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

2 Min Read
महाराष्ट्र

गणपतीसाठी कोकण गाठताना चाकरमान्यांची परीक्षा; रेल्वे गाड्या ११ ते १२ तास उशिराने, प्रवाशांचा संताप

2 Min Read
महाराष्ट्र

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?