ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्यासाठी मुंबईत सीजेपीचे ‘जेलभरो’ आंदोलन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्यासाठी मुंबईत सीजेपीचे ‘जेलभरो’ आंदोलन
महाराष्ट्र

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्यासाठी मुंबईत सीजेपीचे ‘जेलभरो’ आंदोलन

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 8:34 am
Gramin Varta
150 Views
Share

पारदर्शकता आणि एसआयआरवरून केंद्र व निवडणूक आयोगावर टीका

मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याच्या मुद्द्यावरून कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली शुक्रवारी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे ‘जेलभरो आंदोलन’ करण्यात आले.

आंदोलनादरम्यान निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेवरून तसेच निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेदांवरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद सुरू आहे. दोन निवडणूक आयुक्तांनी एसआयआरशी संबंधित काही निर्णयांवर आक्षेप नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर सीजेपीसह काही गटांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, निवडणूक आयोगाने निर्णयप्रक्रियेतील मतभेद हे संस्थेच्या अंतर्गत कामकाजाचा भाग असल्याचे स्पष्ट केले असून, संबंधित निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. अभिनेता नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी आणि गायक-संगीतकार विशाल ददलानी यांच्यासह काही कलाकारांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावली.

आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. शिवाजी पार्कचा वापर, वाहतूक आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्थेच्या कारणांचा पोलिसांनी उल्लेख केला होता. त्यानंतरही सीजेपीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आंदोलनासंदर्भातील ‘जेल’विषयक वक्तव्याचा उल्लेख करत दिपके यांनी सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री, तुम्ही तीन दिवस जेलमध्ये टाकण्याचे बोललात. अन्यथा 3 महिन्यांचे बोलला असता तर संपूर्ण मुंबई बंद पडली असती, असा दावा करत दिपके यांनी आंदोलनकर्त्यांना अटक करण्याचे आव्हान दिले. त्यांनी आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याचा इशारा दिला.

दरम्यान, सीजेपीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन देशातील इतर शहरांमध्येही नेण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनामुळे निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, मतदार यादीच्या एसआयआर प्रक्रियेतील पारदर्शकता आणि आयोगाच्या निर्णयप्रक्रियेबाबतचा सार्वजनिक वाद आणखी चर्चेत आला आहे. आयोगाने मात्र आपल्या निर्णयप्रक्रियेचे समर्थन केले असून अंतर्गत मतभेद हे संस्थात्मक निर्णयप्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार; राज्यात उभारणार २० हजार सुसज्ज कायमस्वरूपी परीक्षा केंद्रांचे सामायिक जाळे

Gramin Varta
2 Min Read

Best beaches in the UK for the Perfect Sandy Getaway

Sponsored by

कोकणातल्या ‘या’ गावात माणसांसाठी नव्हे तर चक्क गिधाडांसाठी गेल्या २४ वर्षांपासून डीजेला बंदी

Gramin Varta
3 Min Read

घराच्या पडवीत शांत झोपलेल्या माऊल्यांवर काळाचा घाला; अंगावरील सोन्यासाठी दोन वृद्ध जीवांची क्रूर हत्या

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

दागिन्यांसाठी केला मावशीचा खून; ४० दिवसांनी भाच्याच्या कृत्याचा पर्दाफाश

3 Min Read
महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे कर्करोगाने निधन; तीन दशकांची गाजलेली अभिनय कारकीर्द संपुष्टात

2 Min Read
महाराष्ट्र

ठाण्यात ठाकरेसेनेच्या शाखाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

2 Min Read
महाराष्ट्र

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी 6 वर्षांनी गुन्हा दाखल; सामूहिक अत्याचार, हत्येसह कटाचे कलम

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?