ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात सोमवारी संघर्ष मोर्चा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात सोमवारी संघर्ष मोर्चा
महाराष्ट्र

गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात सोमवारी संघर्ष मोर्चा

Gramin Varta
Last updated: November 7, 2026 8:14 am
Gramin Varta
Share

कोल्हापूर : गोकुळच्या सत्तासंघर्षाची धग आता थेट रस्त्यावर पोहोचणार असून, राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चाची हाक दिली आहे.

येत्या ९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते लोकशाहीच्या रक्षणासाठी सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या नियोजनासाठी कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयात समविचारी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी झाली.

बैठकीत महायुतीवर गोकुळची सत्ता बळकावण्यासाठी कुटील राजकारण केल्याचा आरोप करण्यात आला. मोर्चात कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापुरचा स्वाभिमान आणि ताकद दाखवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. हुकूमशाही मोडून काढून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरकारला धडकी भरवणारा मोर्चा काढू, असा आक्रमक इशारा महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी दिला. ही लढाई केवळ कोल्हापूर किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून, देशाची लोकशाही टिकवण्याची लढाई आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक सुनील मोदी यांनी केले. गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वाभिमानाचा विषय आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी हा मोर्चा महत्त्वाचा असून, कोल्हापुरातील कामगार, झेन-जी तरुण आणि विविध संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापुरचा स्वाभिमान उंचावावा, असे आवाहन आनंद माने यांनी केले. तर गोकुळचा ब्रँड वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून, या संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून शासनाला काळा कायदा रद्द करण्यास भाग पाडू, असा इशारा सरलाताई पाटील यांनी दिला. काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष राम पाटील यांनी प्रास्ताविक केले.

बैठकीत जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, संग्राम पाटील, गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, नगरसेवक सुनील मोदी, दुर्वास कदम, आनंद माने, सरलाताई पाटील, अमर पाटील, माजी नगरसेवक धनंजय सावंत आदींनी आपली भूमिका मांडली. बैठकीला महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक मधुकर रामाने, नगरसेविका ऋग्वेदा माने, दीपाली घाटगे, उदयानी साळुंखे, केडीसीसी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, युवराज गवळी, एम. आर. पाटील, बाळासाहेब सरनाईक, रणवीर मोरे, भरत रसाळे आदी उपस्थित होते.

Total Visitors :

5468573
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रशियन ड्रोन हल्ल्यातून बचावलेले तीन भारतीय मायदेशी रवाना

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वर : सांभाळ करावा लागतो म्हणून ९१ वर्षांच्या वृद्धेला बांबूने बेदम मारहाण;  नायरीतील महिलेवर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

Future Changes Shape: Express Yourself with Galaxy Z Flip

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

कळझोंडी बुद्ध विहार येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न; ६२ रुग्णांनी घेतला लाभ

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

मराठवाड्यात पावसाची ३१ टक्के तूट; ५,५६० गावांवर संकट

1 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्राची कन्या स्वीडनच्या संसदेत; कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी नीला विखे पाटील खासदारपदी

2 Min Read
महाराष्ट्र

दिवाळीच्या खरेदीची स्वप्ने अधुरीच! घराबाहेर पडलेले तीन तरुण मृत्यूच्या जबड्यात; ऊसाच्या ट्रकखाली दुचाकीचा चक्काचूर

2 Min Read
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्तांना दिलासा! शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शासन निर्णय जाहीर

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?