ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दुष्काळग्रस्तांना दिलासा! शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शासन निर्णय जाहीर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दुष्काळग्रस्तांना दिलासा! शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शासन निर्णय जाहीर
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्तांना दिलासा! शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शासन निर्णय जाहीर

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 8:00 am
Gramin Varta
37 Views
Share

मुंबई: राज्यात अपुऱ्या पावसामुळे गंभीर दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील तब्बल 305 तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या ट्रिगर वन उपाययोजना लागू करण्याची घोषणा केली आहे.

त्यासोबतच राज्य सरकारनं आता शेतकरी आणि पाण्याच्या नियोजनाच्या दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकारानं आणखी एक मोठा दिलासा दिला असून शेती कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

सरकारनं शेती कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यासोबतच पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचेही आदेश या शासन निर्णयात देण्यात आलेत. त्यासोबतच 30 एप्रिल 2027 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देश राज्यातील बँकांना शासनाकडून देण्यात आलेत. तसेच, शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश निर्णयात देण्यात आले आहेत.

राज्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे कोरडा दुष्काळ पडला आहे. जवळपास 75 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली आला आहे. राज्य सरकारनं सुरुवातीला 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. त्यानंतर दुष्काळी तालुक्यांच्या यादीत आणखी 43 तालुक्यांचा समावेश केला. यासोबतच राज्य सरकारने आता शेतकरी आणि पाण्याच्या नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याशिवाय, राज्याचे महसूलमंत्री आणि दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक महत्त्वाची घोषणा केली आहे. दुष्काळात शेतकऱ्यांच्या दारी बँक किंवा पतसंस्थेचा कोणताही कर्मचारी जाता कामा नये, अशी सक्त ताकीद चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांना सूचना देण्यात याव्यात, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दुष्काळाच्या काळात गरीब शेतकरी आणि शेतमजूर यांना मोठा फटका बसू नये, यासाठी त्यांना गावात रोजगार उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीनं राज्य सरकारनं पावलं उचलली आहेत. त्यासाठी रोजगार हमी योजना विभागानं 6 हजार 728 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिलाय. या माध्यमातून दुष्काळी भागात सिंचनाची कामं, गायगोठे, वैयक्तिक फळबाग लागवड , बोअरवेल पुर्नभरण, बांबू लागवड, प्रधानमंत्री आवास योजना, रेशीम उद्योगासाठी शेड, बांधकाम आणि कंपोस्ट खड्ड्यांचे बांधकाम, सार्वजनिक तलावांची दुरुस्ती अशाप्रकारची कामं हाती घेतली जाणार आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना आवाहन

Gramin Varta
1 Min Read

राजापूर : आडिवऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त राज्यस्तरीय सोलो व ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा

Gramin Varta
1 Min Read

२९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कापशी नदीवरील वीर-काजुर्ली पुलाला अखेर गती; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागेची प्रत्यक्ष पाहणी

Gramin Varta
3 Min Read

पाचल विद्यालयाचे लिपिक महेंद्र धामापूरकर यांचे हृदयविकाराने निधन; परिसरात हळहळ

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

महाराष्ट्रात दुष्काळी संकटावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत; केंद्राची वाट न पाहता राज्य शासन मदत देणार

3 Min Read
महाराष्ट्र

मातंग समाजाचा सीएसएमटी परिसरात ठिय्या; आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र

2 Min Read
महाराष्ट्र

अभ्यासाची स्वप्ने डोळ्यांत घेऊन निघाली, अन् वाटेतच डंपरखाली चिरडून १९ वर्षीय मुस्कानचा दुर्दैवी अंत

2 Min Read
महाराष्ट्र

अकरावी प्रवेशाचा घोळ कायम; तब्बल १२ वी विशेष फेरी जाहीर, ८ लाख ८५ हजार जागा अजूनही रिक्त

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?