ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अभ्यासाची स्वप्ने डोळ्यांत घेऊन निघाली, अन् वाटेतच डंपरखाली चिरडून १९ वर्षीय मुस्कानचा दुर्दैवी अंत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अभ्यासाची स्वप्ने डोळ्यांत घेऊन निघाली, अन् वाटेतच डंपरखाली चिरडून १९ वर्षीय मुस्कानचा दुर्दैवी अंत
महाराष्ट्र

अभ्यासाची स्वप्ने डोळ्यांत घेऊन निघाली, अन् वाटेतच डंपरखाली चिरडून १९ वर्षीय मुस्कानचा दुर्दैवी अंत

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 8:57 am
Gramin Varta
179 Views
Share

नागपूर : उज्ज्वल भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून शिक्षणासाठी घराबाहेर पडलेल्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीवर भररस्त्यात काळाने घाला घातला. मानकापूर परिसरातील गोधनी-झेंडा चौक मार्गावर मंगळवारी सायंकाळी भरधाव डंपरने ई-स्कूटरला दिलेल्या भीषण धडकेत मुस्कान देवाचंद खियालदासानी (वय 19, रा. जरीपटका) या बी.टेक. विद्यार्थिनीचा डंपरच्या मागील चाकाखाली चिरडून जागीच अत्यंत हृदयद्रावक मृत्यू झाला. बोखारा येथील झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या मुस्कानचा असा अचानक आणि अकाली अंत झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जरीपटका परिसरासह तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये तीव्र शोक व्यक्त होत आहे.

मंगळवारी सायंकाळी पावणेसहा ते सहा वाजताच्या सुमारास मुस्कान ही तिची मैत्रीण राजलक्ष्मी लोखंडे हिच्यासोबत ई-स्कूटरने गोधनी-झेंडा चौक रस्त्यावरून जात होती. त्यावेळी पाठीमागून अत्यंत वेगाने आलेल्या एका डंपरने त्यांच्या ई-स्कूटरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोघीही रस्त्यावर फेकल्या गेल्या. यात पाठीमागे बसलेली मुस्कान रस्त्याच्या उजव्या बाजूला पडली आणि डंपरचा मागील भाग तिच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन तिचा जागीच जीव गेला, तर ई-स्कूटर चालविणारी राजलक्ष्मी जखमी झाली असून तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

अपघातानंतर माणुसकीला काळीमा फासत डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने तत्परता दाखवत पाठलाग करून डंपर अडवला आणि चालकाला वाहनासह पोलिसांच्या ताब्यात दिले. दामोदर सिताराम सहारे (वय 61, रा. नारी-कपिल नगर) असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे तपास सुरू केला असून, चालकाकडून वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले होते का, याचाही सखोल तपास केला जात आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

अभ्यासाची स्वप्ने डोळ्यांत घेऊन निघाली, अन् वाटेतच डंपरखाली चिरडून १९ वर्षीय मुस्कानचा दुर्दैवी अंत

Gramin Varta
2 Min Read

खेड : बोरघर-राहाटवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून पाच हजारांची रोकड लंपास

Gramin Varta
1 Min Read

ठाण्यात ठाकरेसेनेच्या शाखाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

Gramin Varta
2 Min Read

देशात 2029 पूर्वी समान नागरी कायदा लागू करणार – अमित शाह

Gramin Varta
4 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी दिलासा; ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता २४ सप्टेंबरनंतर बँक खात्यात जमा होण्याची शक्यता

2 Min Read
महाराष्ट्र

आशियाई क्रीडा स्पर्धा: महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात भारत पाचव्या स्थानी;मनू भाकर अंतिम फेरी गाठण्यात अपयशी

1 Min Read
महाराष्ट्र

रायगड – भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा; तरुण रक्तबंबाळ

1 Min Read
महाराष्ट्र

वंदे मातरम याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?