ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पाचल विद्यालयाचे लिपिक महेंद्र धामापूरकर यांचे हृदयविकाराने निधन; परिसरात हळहळ
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पाचल विद्यालयाचे लिपिक महेंद्र धामापूरकर यांचे हृदयविकाराने निधन; परिसरात हळहळ
राजापूर

पाचल विद्यालयाचे लिपिक महेंद्र धामापूरकर यांचे हृदयविकाराने निधन; परिसरात हळहळ

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 5:28 pm
Gramin Varta
328 Views
Share

राजापूर : पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथे लिपिक म्हणून सेवेत असलेले महेंद्र रमेश धामापूरकर (वय ४९) यांचे शुक्रवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. कुडाळ तालुक्यातील पडवे येथील रुग्णालयातून उपचारानंतर केळवली येथील निवासस्थानी आणत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आकस्मिक जाण्याने पाचल व केळवली पंचक्रोशीत तीव्र शोककळा पसरली आहे.

मूळचे केळवली येथील रहिवासी असलेले महेंद्र धामापूरकर यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९७७ रोजी झाला होता. सन २००८ पासून ते सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथे लिपिक म्हणून अविरत सेवा बजावत होते. मनमिळाऊ, शांत आणि कर्तव्यदक्ष स्वभाव असलेल्या धामापूरकर यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गात स्वतःचे आपुलकीचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या शासकीय सेवेची अजून सुमारे १० वर्षे शिल्लक होती.

दरम्यान, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांच्यावर अर्धांगवायूचे (पॅरालिसिस) उपचार सुरू होते. त्यातच शनिवारी, १९ सप्टेंबर रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी कुडाळ येथील पडवे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून घरी परतत असताना रस्त्यातच त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त होत असून पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, प्रशाला परिवार व ग्रामस्थांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोलीत मुलाचा आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने मारहाण

Gramin Varta
2 Min Read

‘सेवा संकल्प अभियाना’ने तीन वर्षांच्या चिमुरडीला दिले नवे आयुष्य; दुभंगलेले ओठ आणि टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला इंडिया आघाडीचा मोर्चा

Gramin Varta
2 Min Read

अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाईचा बडगा; रत्नागिरीत मत्स्य विभागाची धडक कारवाई

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

राजापूर

खापणे महाविद्यालयाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष

2 Min Read
राजापूर

आशिया रोबोटिक्स स्पर्धेत वडदहसोळच्या अफ्फान मुकादमची सुवर्ण कामगिरी; राजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

2 Min Read
राजापूर

उल्का विश्वासराव यांच्या पुढाकाराने बांबू शेतीला नवी दिशा; राजापूर-लांजातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून नवी दिशा

2 Min Read
राजापूर

रत्नागिरी पोलिसांच्या ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत खरवते येथे सायबर गुन्हेगारी व सुरक्षिततेबाबत जनजागृती

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?