ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रशियन ड्रोन हल्ल्यातून बचावलेले तीन भारतीय मायदेशी रवाना
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रशियन ड्रोन हल्ल्यातून बचावलेले तीन भारतीय मायदेशी रवाना
देश-विदेश

रशियन ड्रोन हल्ल्यातून बचावलेले तीन भारतीय मायदेशी रवाना

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 5:25 am
Gramin Varta
47 Views
Share

दिल्ली: रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथील भारतीय दूतावासाने रशियन ड्रोन हल्ल्यातून बचावलेल्या भारतीय नागरिकांबाबत माहिती दिली आहे. दूतावासाने सांगितले की, सोमवारी काळ्या समुद्रात तुर्कीच्या ‘एमव्ही रोयाद मम्मादोव’ या मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बचावलेले तीन भारतीय नागरिक भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत.

दूतावासाने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीन भारतीय नागरिक साहिल संधू, अश्विनी कुमार आणि हरमन सिंग हे शनिवारी भारतासाठी रवाना झाले आहेत. त्यांच्या मायदेशी परतण्याच्या प्रक्रियेत दूतावासाने आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य केले.या निवेदनात दूतावासाने रोमानियाचे अधिकारी, कॉन्स्टान्टा काउंटी रुग्णालय आणि रोमानियाच्या बचाव पथकांचे मोलाच्या मदतीबद्दल, सहकार्याबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले आहेत.

तुर्कीच्या एका कंपनीच्या मालकीचे हे जहाज युक्रेनमधील इझमेल बंदरातून इटलीतील रेव्हेना येथे मका घेऊन जात होते. सोमवारी रोमानियाच्या सागरी हद्दीबाहेर काळ्या समुद्रात या जहाजावर हल्ला झाला. या घटनेत दोन परदेशी खलाशांचा मृत्यू झाला, तर जहाजावरील अनेक कर्मचारी जखमी झाले. या हल्ल्यात तिन्ही भारतीय नागरिक बचावले. मात्र, त्यापैकी एक जण जखमी झाला होता. त्याच्यावर रोमानियामध्ये उपचार करण्यात आले. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे राष्ट्रीयत्व तातडीने समजू शकले नव्हते.
६ ऑक्टोबर रोजी काळ्या समुद्रात जहाजावरून बचावण्यात आलेल्या तिन्ही भारतीय नागरिकांची दूतावासाच्या प्रतिनिधीने ७ ऑक्टोबर रोजी भेट घेतली होती. त्यापैकी दोघांची एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तर तिसऱ्या व्यक्तीवर कॉन्स्टान्टा येथील काउंटी रुग्णालयात उपचार सुरू होते. दूतावासाने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या पोस्टमध्ये तिन्ही भारतीयांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते. तसेच, जहाज कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधीच्या माध्यमातून दूतावासाने त्यांना मोबाइल फोनसारख्या आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. याशिवाय, स्थानिक भारतीय उपाहारगृहाच्या मदतीने भारतीय जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सोनिया गांधींच्या 1980 मधील मतदार यादीतील नावाचे प्रकरण पुन्हा न्यायालयात

Gramin Varta
2 Min Read

Exploring the Transformative Waves in Modern Technology

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय; निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

Gramin Varta
5 Min Read

लांजा शहरातील शेट्येवाडी येथे श्री देवी भगवती नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना सप्टेंबरचा पगार आजच; बँक संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

1 Min Read
देश-विदेश

ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत विरोधक आक्रमक राहणार – राहुल गांधी

3 Min Read
देश-विदेश

आंदोलनाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी कब्जा अयोग्य- सुप्रीम कोर्ट

2 Min Read
देश-विदेश

दिल्लीतील आंदोलनांमुळे १० दिवसांत व्यापाऱ्यांना ४ हजार कोटींच्या नुकसानाचा अंदाज

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?