ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आंदोलनाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी कब्जा अयोग्य- सुप्रीम कोर्ट
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आंदोलनाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी कब्जा अयोग्य- सुप्रीम कोर्ट
देश-विदेश

आंदोलनाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी कब्जा अयोग्य- सुप्रीम कोर्ट

Gramin Varta
Last updated: November 4, 2026 7:52 am
Gramin Varta
42 Views
Share

दिल्ली: देशातील शेतकरी, वकील, विद्यार्थी अशा विविध घटकांना आंदोलनाचा अधिकार आहे. परंतु, आंदोलनाच्या नावाखाली एखाद्या सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी कब्जा करणे अयोग्य असल्याची टीप्पणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केली.

देशातील विविध आंदोलनांमुळे व्यापाऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान, मोठ्या प्रमाणावर नागरिकांना ताब्यात घेणे, पोलिसांची कथित दडपशाही, मेट्रो स्थानके बंद ठेवणे आणि इंटरनेट सेवा खंडित करणे या मुद्द्यांवर दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज, मंगळवारी सुनावणी घेतली. यावेळी त्यांनी ही टिप्पणी केली.

गेल्या महिन्यात दिल्लीतील जंतर-मंतर येथे विरोधी पक्ष आणि अन्य संघटनांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या विरोधात मोठे आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी ही सुनावणी झाली. जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळाचा ‘निषेध प्रदर्शन स्थळ’ हा दर्जा काढून घेण्याची प्रक्रिया सुरू असताना हा वाद न्यायालयात पोहोचला होता.आंदोलनांमुळे व्यापारावर मोठा परिणाम होत असल्याचे सांगत व्यापारी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने व्यापारी संघटनांना ‘मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील’ आंदोलनाच्या आयोजकांनाही याचिकेत प्रतिवादी म्हणून समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. व्यापाऱ्यांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, आंदोलनस्थळाच्या आसपासच्या परिसरात सुमारे 50 लाख नागरिक वास्तव्यास आहेत. आंदोलनामुळे परिसरातील दुकाने बंद असून, आज दिल्लीतील प्रसिद्ध कनॉट प्लेस परिसरातही ग्राहकांची वर्दळ नसल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, केंद्र सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, जो कोणी आंदोलनाची हाक देतो, त्याने आपल्या कृतींच्या परिणामांची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे.या सुनावणीमुळे आंदोलनाचा घटनात्मक अधिकार आणि त्यातून सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांना होणारा त्रास या दोन्ही मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Total Visitors :

5468418
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

युवासेना संगमेश्वर तालुका आयोजित ‘मखर सजावट स्पर्धा २०२६’ उत्साहात संपन्न; प्रज्वल शिगवण ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

Gramin Varta
2 Min Read

कोकण रेल्वे मार्गाचे येत्या ५ वर्षांत दुपदरीकरण पूर्ण करणार; दररोज धावणार १०० हून अधिक गाड्या

Gramin Varta
2 Min Read

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलवसुलीविरोधात जनआक्रोश समितीची उच्च न्यायालयात धाव; जनहित याचिका करणार दाखल 

Gramin Varta
2 Min Read

‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा हिवाळ्यात कमी थंडी; फेब्रुवारीपासूनच उन्हाळ्याची चाहूल लागून जलस्रोतांवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

नेपाळ सरकारचा मोठा निर्णय; बेपत्ता व्यक्तींना ४५ दिवसांत मृत घोषित करण्याचा अध्यादेश

2 Min Read
देश-विदेश

नेपाळमध्ये ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; अख्खा डोंगर खचून नदीत कोसळला, २४ ठार, १४ बेपत्ता तर शेकडो घरे जमीनदोस्त

2 Min Read
देश-विदेश

प्रधानमंत्री विकसित ग्राम स्वराज योजनेतून ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण; ७,३९५ कोटींची तरतूद

2 Min Read
देश-विदेश

‘जुलै उठावा’तील हिंसाचार प्रकरणी शेख हसीना यांच्या पक्षातील सात नेत्यांना फाशीची शिक्षा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?