ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: युवासेना संगमेश्वर तालुका आयोजित ‘मखर सजावट स्पर्धा २०२६’ उत्साहात संपन्न; प्रज्वल शिगवण ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » युवासेना संगमेश्वर तालुका आयोजित ‘मखर सजावट स्पर्धा २०२६’ उत्साहात संपन्न; प्रज्वल शिगवण ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी
संगमेश्वर

युवासेना संगमेश्वर तालुका आयोजित ‘मखर सजावट स्पर्धा २०२६’ उत्साहात संपन्न; प्रज्वल शिगवण ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

Gramin Varta
Last updated: October 16, 2026 3:20 pm
Gramin Varta
229 Views
Share

संगमेश्वर (दिनेश अंब्रे): गणेशोत्सवाचे औचित्य साधून युवासेना संगमेश्वर तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘मखर सजावट स्पर्धा २०२६’ चा निकाल नुकताच अत्यंत उत्साही वातावरणात जाहीर करण्यात आला. तालुक्यातील स्थानिक कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या स्पर्धेत प्रज्वल शिगवण यांनी आपल्या उत्कृष्ट कलाकृतीचे दर्शन घडवत प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला.

तालुक्यातील एकूण ६० कल्पक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. स्पर्धकांनी पर्यावरणपूरक साहित्य, आकर्षक रोषणाई आणि सामाजिक संदेश देणाऱ्या विविध संकल्पनांवर आधारित मनमोहक मखर सजावट साकारली होती. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत प्रज्वल शिगवण यांनी प्रथम, मृणाल खापरे यांनी द्वितीय तर रोशन रमणे यांनी तृतीय क्रमांक संपादन केला. याशिवाय यश उजगावकर यांनी चतुर्थ आणि अभिषेक खातू यांनी पाचवा क्रमांक पटकावत यश मिळवले. या संपूर्ण स्पर्धेचे निष्पक्ष व काटेकोर परीक्षण विलास रहाटे यांनी पार पाडले.

निकालाच्या या विशेष सोहळ्यास माजी आमदार सुभाष बने, महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे सदस्य तथा युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य अपूर्व सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समवेत राजेंद्र महाडिक, कृष्ण हरेकर आणि ऋतुजा कदम आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी सर्व विजेत्यांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व साठ कलाकारांच्या कल्पकतेचे भरभरून कौतुक करत त्यांना पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सवाच्या परंपरेला सामाजिक आणि कलात्मक जोड देणाऱ्या युवासेनेच्या या स्तुत्य उपक्रमाचे संगमेश्वर तालुक्यातून सर्वत्र स्वागत होत आहे.

Total Visitors :

5468418
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

उक्षी येथे रेल्वेच्या धडकेत झारखंडचा तरुण कामगार गंभीर जखमी; रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाले तातडीचे उपचार

Gramin Varta
2 Min Read

आरपीआय आठवले गटाचा संघटन बांधणीवर भर; खंडाळा विभागात विशेष बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Gramin Varta
2 Min Read

फार्मसी महाविद्यालय सावर्डे येथे सीपीआर व प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

Gramin Varta
1 Min Read

दापोलीतील ६१२ गुंठे वक्फ जमिनीच्या कथित बेकायदेशीर व्यवहाराची राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून गंभीर दखल; वक्फ मंडळाला १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

देवरुख : सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारून दुसऱ्याला ट्रान्स्फर करणाऱ्यावर गुन्हा

2 Min Read
संगमेश्वर

सहा महिन्यांत साडेतीन कोटींचे उत्पन्न देणारे संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक चार एक्स्प्रेसच्या थांब्यांसाठी प्रतीक्षेत; रेल्वे बोर्डाच्या मंजुरीकडे प्रवाशांचे लक्ष

2 Min Read
संगमेश्वर

माकडांच्या वाढत्या उपद्रवावर बंदोबस्तासाठी ग्रामस्थांच्या पुढाकाराने वनविभागाकडून पिंजरा दाखल

1 Min Read
संगमेश्वर

देवरुख पंचायत समितीच्या स्वागत कक्षात वर्तमानपत्रांची सोय; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांची जिल्ह्यात सर्वप्रथम अंमलबजावणी, सभापती शर्वरी वेल्ये यांचा गौरव

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?