ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सहा महिन्यांत साडेतीन कोटींचे उत्पन्न देणारे संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक चार एक्स्प्रेसच्या थांब्यांसाठी प्रतीक्षेत; रेल्वे बोर्डाच्या मंजुरीकडे प्रवाशांचे लक्ष
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सहा महिन्यांत साडेतीन कोटींचे उत्पन्न देणारे संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक चार एक्स्प्रेसच्या थांब्यांसाठी प्रतीक्षेत; रेल्वे बोर्डाच्या मंजुरीकडे प्रवाशांचे लक्ष
संगमेश्वर

सहा महिन्यांत साडेतीन कोटींचे उत्पन्न देणारे संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक चार एक्स्प्रेसच्या थांब्यांसाठी प्रतीक्षेत; रेल्वे बोर्डाच्या मंजुरीकडे प्रवाशांचे लक्ष

Gramin Varta
Last updated: October 20, 2026 10:36 am
Gramin Varta
88 Views
Share

संगमेश्वर: कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाने अवघ्या सहा महिन्यांत सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला असून एकट्या गणेशोत्सवाच्या कालावधीत स्थानकाला तब्बल ९५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आणि विक्रमी महसूल मिळवून देणाऱ्या या स्थानकावर मात्र अद्याप चार महत्त्वाच्या साप्ताहिक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळालेला नसल्याने संगमेश्वर तालुकावासीयांसह कोकणातील प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कोट्यवधींचे उत्पन्न देऊनही हक्काच्या रेल्वे थांब्यासाठी प्रवाशांना ताटकळत राहावे लागत असल्याचे विदारक चित्र सध्या निर्माण झाले आहे.

संगमेश्वर परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी बांद्रा–मडगाव एक्स्प्रेस (१०११५/१०११६), श्री गंगानगर–तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस (१६३११/१६३१२), अजमेर–एर्नाकुलम मरुसागर एक्स्प्रेस (१२९७७/१२९७८) आणि जबलपूर–कोईम्बतूर एक्स्प्रेस (०२१९७/०२१९८) या चार प्रमुख लांब पल्ल्याच्या गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मंजूर करावा, अशी प्रवाशांची जुनी आणि आग्रही मागणी आहे. यासंदर्भात कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाकडे सकारात्मक प्रस्ताव सादर केला आहे. या मागणीला पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार शेखर निकम, आमदार प्रमोद जठार, पद्मश्री दादा इदाते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनीही रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. तसेच पद्मश्री गजानन माने यांनी थेट कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याशी झालेल्या बैठकीत हा प्रश्न मांडला होता.

संगमेश्वर तालुक्यातील अनेक दुर्गम गावांसाठी हे रेल्वे स्थानक मुख्य केंद्र असल्याने या गाड्यांचे थांबे प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक बनले आहेत. या थांब्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरच यश मिळेल, असा विश्वास निसर्गरम्य चिपळूण/संगमेश्वर ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी व्यक्त केला आहे. आता रेल्वे बोर्ड या जनभावनेचा आदर करून सकारात्मक निर्णय कधी घेते आणि संगमेश्वरकरांची थांब्यांची प्रतीक्षा कधी संपते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5468412
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा; ‘व्होट चोरी’च्या आरोपावरून रणशिंग फुंकले

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत ऊन-पावसाच्या लपंडावात आरोग्य धोक्यात; रुग्णालयांत रांगा

Gramin Varta
2 Min Read

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव जाधव यांच्या मातोश्री सुलोचना जाधव यांचे निधन

Gramin Varta
1 Min Read

आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन पोलिसांनी उधळले; आझाद मैदानात परवानगी नाकारत विद्यार्थ्यांना मुंबईबाहेर धाडले, २५ ऑक्टोबरला पुन्हा धडकण्याचा इशारा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

देवरुखच्या सामाजिक कार्यकर्त्या वैदेही सावंत यांचा पुण्यात ‘नवदुर्गा सन्मान २०२६’ पुरस्काराने गौरव; महिला सक्षमीकरणातील योगदानाची दखल

2 Min Read
संगमेश्वर

चिमुकल्या मोदकांवर अवतरले साक्षात अष्टविनायक; विलास राहटे यांचा सूक्ष्म कलाविष्कार गणेशभक्तांच्या पसंतीस

2 Min Read
संगमेश्वर

न्यू आयडियल रेसिडेन्सी, भडगाव खोंडे येथे दांडिया, लेझिम आणि ‘होम मिनिस्टर’चा जल्लोष

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : सांभाळ करावा लागतो म्हणून ९१ वर्षांच्या वृद्धेला बांबूने बेदम मारहाण;  नायरीतील महिलेवर गुन्हा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?