ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संगमेश्वर : सांभाळ करावा लागतो म्हणून ९१ वर्षांच्या वृद्धेला बांबूने बेदम मारहाण;  नायरीतील महिलेवर गुन्हा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संगमेश्वर : सांभाळ करावा लागतो म्हणून ९१ वर्षांच्या वृद्धेला बांबूने बेदम मारहाण;  नायरीतील महिलेवर गुन्हा
संगमेश्वर

संगमेश्वर : सांभाळ करावा लागतो म्हणून ९१ वर्षांच्या वृद्धेला बांबूने बेदम मारहाण;  नायरीतील महिलेवर गुन्हा

Gramin Varta
Last updated: November 2, 2026 11:34 am
Gramin Varta
879 Views
Share

संगमेश्वर: वयोवृद्ध महिलेचा सांभाळ करावा लागतो आणि त्यामुळे स्वतःला कुठेही फिरायला जाता येत नाही या क्षुल्लक रागातून ९१ वर्षांच्या वृद्ध महिलेला लाकडी बांबूने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथे घडली आहे. या मारहाणीत वृद्ध महिलेच्या हात, पाय आणि गुडघ्याला गंभीर दुखापती झाल्या असून, याप्रकरणी नाशिरा अस्लम मोडक (रा. नायरी, ता. संगमेश्वर) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील सीवूड्स, नेरूळ येथे वास्तव्यास असलेल्या जैबुन्निसा निजामउद्दीन लांबे (वय ६०) यांची आई जलेखा इसाक मोडक (वय ९१) या संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथे राहतात. वय अत्यंत जास्त असल्याने जलेखा मोडक यांना दैनंदिन देखभालीसाठी आधार लागतो. मात्र, वृद्धेचा सांभाळ करावा लागत असल्यामुळे आपल्याला घराबाहेर कुठेही जाता येत नाही, या रागातून आरोपी नाशिरा मोडक हिने २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी चार ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात वृद्धेशी वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात तिने हातातील लाकडी बांबूने आणि लाथाबुक्क्यांनी जलेखा मोडक यांना अमानुष मारहाण केली. या मारहाणीत वृद्धेचा उजवा गुडघा, डावा पाय आणि उजव्या मनगटाला लहान-मोठ्या गंभीर जखमा झाल्या.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जखमी वृद्धेच्या मुलीने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तेथे सुरुवातीला शून्य क्रमांकाने दाखल झालेला हा गुन्हा सीसीटीएनएस प्रणालीद्वारे संगमेश्वर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ११५(२) आणि ११८(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. एका अतिवृद्ध महिलेवर झालेल्या या क्रूर मारहाणीमुळे परिसरामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Total Visitors :

5468418
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

एका सेकंदात ५९२ वेळा फिरणाऱ्या न्यूट्रॉन ताऱ्याचे महाकाय रेडिओ पल्सेस शोधले

Gramin Varta
3 Min Read

न्यू आयडियल रेसिडेन्सी, भडगाव खोंडे येथे दांडिया, लेझिम आणि ‘होम मिनिस्टर’चा जल्लोष

Gramin Varta
1 Min Read

गोवळकोट धक्का परिसरातील खेळाच्या मैदानाची आरोग्य सभापतींकडून पाहणी; नगरसेविका मिसबाह नाखुदा यांच्या मागणीनंतर तातडीने स्वच्छतेचा दिला शब्द

Gramin Varta
1 Min Read

१५२ वर्षांची अखंड परंपरा! २५ घरांचा एकच बाप्पा

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

गणेशोत्सवात साहिल आंबवकरने साकारला शिमगा आणि गणेशोत्सवाचा अनोखा देखावा

2 Min Read
संगमेश्वर

ढोल-ताशांचा गजर अन् साश्रू नयनांनी दाभोळ्याच्या दुर्गामातेला निरोप

1 Min Read
संगमेश्वर

देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रातील अवकाश शास्त्र आणि तंत्रज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन

1 Min Read
संगमेश्वर

मार्लेश्वर मार्गावर चिखलाचे साम्राज्य ; दसऱ्याच्या मुहूर्तावर पर्यटकांसह भाविक रस्त्यातच अडकले

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?