ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: नेपाळ सरकारचा मोठा निर्णय; बेपत्ता व्यक्तींना ४५ दिवसांत मृत घोषित करण्याचा अध्यादेश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » नेपाळ सरकारचा मोठा निर्णय; बेपत्ता व्यक्तींना ४५ दिवसांत मृत घोषित करण्याचा अध्यादेश
देश-विदेश

नेपाळ सरकारचा मोठा निर्णय; बेपत्ता व्यक्तींना ४५ दिवसांत मृत घोषित करण्याचा अध्यादेश

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 5:33 am
Gramin Varta
52 Views
Share

काठमांडु: नेपाळ सरकारने नैसर्गिक आपत्तींमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तींना कायदेशीररीत्या मृत घोषित करण्याची कालमर्यादा १२ वर्षांवरून थेट ४५ दिवसांवर आणली आहे.

राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी जारी केलेला अध्यादेश २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण पुराच्या घटनेला ४५ दिवस पूर्ण होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी लागू करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयामुळे पुरानंतर बेपत्ता असलेल्या ५,२८५ व्यक्तींच्या कुटुंबीयांना मृत्यू प्रमाणपत्र मिळवणे आणि त्यासंबंधीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे सुलभ होणार आहे.

या अध्यादेशामुळे प्रभावित कुटुंबांना मृत्यू प्रमाणपत्र मिळवणे, सरकारी नुकसानभरपाई प्राप्त करणे, विम्याचे दावे निकाली काढणे आणि मालमत्तेच्या वारसाहक्काशी संबंधित कायदेशीर अडचणी दूर करणे सोपे होणार आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये नेपाळी नागरिकांसोबतच किमान १८९ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. या व्यक्तींचे कुटुंबीय दुर्घटनेनंतर अनिश्चिततेचा सामना करत होते. तसेच, प्रशासकीय प्रक्रियांमधील अडथळ्यांमुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार जारी करण्यात आलेला हा अध्यादेश तत्काळ प्रभावाने लागू झाला आहे. बेपत्ता भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना अर्ज करण्यासाठी संबंधित व्यक्ती २६ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त भागात उपस्थित असल्याचे पुरावे सादर करावे लागतील. या माहितीची पडताळणी करण्यासाठी काठमांडू येथील भारतीय दूतावास नेपाळच्या प्रशासनाशी समन्वय साधणार आहे.त्यानंतर स्थानिक नोंदणी कार्यालये नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रे, पोलिसांचा अहवाल आणि भारतीय दूतावासाने दिलेले प्रमाणपत्र यांच्या आधारे अर्जांवरील पुढील प्रक्रिया पूर्ण करतील.

नेपाळच्या अधिकाऱ्यांकडून मृत्यू प्रमाणपत्र जारी झाल्यानंतर आणि आवश्यक वाणिज्यदूत कार्यालयाशी संबंधित औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, संबंधित कुटुंबीय भारतात मालमत्तेचा वारसाहक्क मिळवणे, विम्याचे दावे निकाली काढणे आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या कागदपत्रांचा वापर करू शकतील.मात्र, नेपाळ सरकारच्या आपत्ती निवारण निधीतून दिल्या जाणाऱ्या आर्थिक नुकसानभरपाईसाठी परदेशी नागरिक पात्र असतील की नाही, याबाबत अध्यादेशात स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.

Total Visitors :

5468436
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पहिल्या कॉमनवेल्थ कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक; चिपळूणच्या शुभम शिंदेच्या चमकदार कामगिरीने क्रीडा क्षेत्रात जल्लोष

Gramin Varta
2 Min Read

महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वे शीतगृहाची रत्नागिरीत होणार उभारणी

Gramin Varta
2 Min Read

पाली येथे भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

Gramin Varta
2 Min Read

राखीव निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचे, हे ठरवणे निवडणूक आयोगाची जबाबदारी, शिंदे गटाचा युक्तिवाद

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावले अन् सात जणांचा काटा काढला; हत्याकांडाने देश हादरला, नंदी हिल्सच्या पायथ्याशी मृतदेहांची शोधमोहीम!

4 Min Read
देश-विदेश

इंडी आघाडीच्या बैठकीत एसआयआर, ईव्हीएम आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यावर सहमती

6 Min Read
देश-विदेश

एअर मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख

2 Min Read
देश-विदेश

केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना सप्टेंबरचा पगार आजच; बँक संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?