ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: देवरुख: इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके फाईल डाऊनलोड करणे पडले महागात; तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » देवरुख: इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके फाईल डाऊनलोड करणे पडले महागात; तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक
संगमेश्वर

देवरुख: इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके फाईल डाऊनलोड करणे पडले महागात; तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 9:49 am
Gramin Varta
99 Views
Share

देवरूख : सोशल मीडियावरील अज्ञात लिंक अथवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा प्रत्यय देवरूख परिसरात आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली एक संशयास्पद एपीके (APK) फाईल डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल हॅक करून एका २१ वर्षीय तरुणाच्या बँक खात्यातून तब्बल ५५ हजार ५९९ रुपयांची रक्कम परस्पर लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साडवली साईनगर (ता. संगमेश्वर) येथील रहिवासी कु. कौस्तुभ संतोष सोमण (वय २१) हा ७ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयात लिंकडीनचे सत्र चालू असताना उपस्थित होता. दुपारी ११ च्या सुमारास त्याच्या मोबाईलवरील इन्स्टाग्राम ॲपवर एका अनोळखी व्यक्तीकडून एपीके फाईल प्राप्त झाली. ती फाईल डाऊनलोड केल्यानंतर त्याचा मोबाईल संशयास्पदरीत्या त्या दिवशी चार ते पाच वेळा अचानक बंद पडू लागला. दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजता त्याचा फोन पुन्हा बंद पडला. त्याने तो सुरू केल्यानंतर काही वेळातच, म्हणजेच दुपारी १२.५२ वाजता त्याच्या बँक ऑफ महाराष्ट्र, देवरूख शाखेतील खात्याशी लिंक असलेल्या गुगल पे खात्यातून परस्पर ५५ हजार ५९९ रुपये अज्ञात आरोपीच्या ‘kumarrakesh2997@bpunity’ या युपीआय आयडीवर वळते करण्यात आले.

त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता फिर्यादी कौस्तुभने खात्यावरील शिल्लक तपासली असता, आपल्या खात्यातून परस्पर मोठी रक्कम वळती झाल्याचे आणि सायबर फसवणूक झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. या आर्थिक फसवणुकीप्रकरणी कौस्तुभ सोमण याने दिलेल्या फिर्यादीवरून १ ऑक्टोबर २०२६ रोजी देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५५/२०२६ नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, देवरूख पोलीस या सायबर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. अनोळखी ॲप्स आणि संशयास्पद एपीके फाईल्स मोबाईलमध्ये डाऊनलोड न करण्याचे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

‘स्कील इज फ्युचर’; तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी कौशल्ये सातत्याने अपग्रेड करावीत: जिल्हाधिकारी मनुज जिंदल

Gramin Varta
2 Min Read

हप्ता थकला तरी बळजबरीने वाहन जप्ती करता येणार नाही; फायनान्स कंपनीला १० लाखांच्या दंडासह वसुली नियमांवर कडक ताशेरे

Gramin Varta
3 Min Read

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारकडे आग्रही, प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू – शरद पवार

Gramin Varta
4 Min Read

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात दाभोळे परिसरातील लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू

1 Min Read
संगमेश्वर

AI Unleashed Exploring the Future of Machine Learning and Robotics

7 Min Read
संगमेश्वर

शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत
अजीजा दाऊद नाईक हायस्कूलचे वर्चस्व

1 Min Read
संगमेश्वर

‘कॅम्पस से संसद’ उपक्रमासाठी आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या अनुष्का पर्शराम हिची निवड

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?