ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिवेलीतील ३३ लाखांच्या पेयजल योजना घोटाळ्यात कारवाईला टाळाटाळ; संतप्त ग्रामस्थांची पाणी पुरवठा विभागावर धडक, १० दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिवेलीतील ३३ लाखांच्या पेयजल योजना घोटाळ्यात कारवाईला टाळाटाळ; संतप्त ग्रामस्थांची पाणी पुरवठा विभागावर धडक, १० दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन
चिपळूण

चिवेलीतील ३३ लाखांच्या पेयजल योजना घोटाळ्यात कारवाईला टाळाटाळ; संतप्त ग्रामस्थांची पाणी पुरवठा विभागावर धडक, १० दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन

Gramin Varta
Last updated: September 18, 2026 9:06 am
Gramin Varta
10 Views
Share

चिपळूण (विशेष प्रतिनिधी): चिपळूण तालुक्यातील चिवेली येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत झालेल्या तब्बल ३३ लाखांच्या कथित अपहारप्रकरणी विभागीय कोकण आयुक्तांनी महिनाभरापूर्वीच फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश देऊनही प्रशासनाकडून कारवाईत चालढकल सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने संतप्त झालेल्या चिवेली ग्रामस्थांनी थेट चिपळूण पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर येत्या दहा दिवसांत संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई पूर्ण करण्याचे आश्वासन उपअभियंत्यांनी दिले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी चिवेलीतील राष्ट्रीय पेयजल योजनेतील अनियमिततेबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर झालेल्या दोन स्वतंत्र चौकशांमधून कोणतीही प्रत्यक्ष कामे न करताच संबंधित ठेकेदाराला सुमारे ३३ लाख रुपयांची खिरापत वाटल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या गंभीर प्रकरणाची जिल्हा परिषद तसेच कोकण भवन स्तरावर वेळोवेळी सविस्तर सुनावणी पार पडली. अखेर विभागीय कोकण आयुक्तांनी या पाणी योजनेत ३३ लाखांचा संशयित अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. तसेच ही अपहाराची रक्कम संबंधित दोषींकडून वसूल करण्याच्या सक्त सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र महिनाभराचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही दोषींवर कारवाई न झाल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ सिद्धेश शिर्के, निलेश सुर्वे, मोहन गुजर आणि अशोक मोहिते यांनी पंचायत समितीचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता दिगंबर पाटील यांची भेट घेऊन आयुक्तांच्या आदेशाची आठवण करून दिली. या कोट्यवधींच्या योजनेतील अपहारास जबाबदार असणारे तत्कालीन अधिकारी, ठेकेदार, पाणी पुरवठा समिती आणि खर्चास मंजुरी देणाऱ्या संबंधित समित्यांच्या पदाधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अपहाराची संपूर्ण रक्कम वसूल करण्यात यावी, असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यावर स्पष्टीकरण देताना उपअभियंता पाटील यांनी सांगितले की, दोषींवर कारवाईची प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्हा परिषदेने या संपूर्ण प्रकरणाचा १७० पानांचा विस्तृत अहवाल तयार केला असून या अहवालाचे बारकाईने अवलोकन करून आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील दहा दिवसांत संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी तूर्तास माघार घेतली असली तरी दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

‘देवाजीच्या दारी आज रंगला अभंग’; प्रादेशिक मनोरुग्णालयात भक्तीचा रंग

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

Traversing the Wonders of Earth’s Diverse and Complex Ecosystems

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

देवरुख : सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारून दुसऱ्याला ट्रान्स्फर करणाऱ्यावर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

२९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कापशी नदीवरील वीर-काजुर्ली पुलाला अखेर गती; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागेची प्रत्यक्ष पाहणी

3 Min Read
चिपळूण

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी २.० पोर्टल तातडीने सुरू करा

2 Min Read
चिपळूण

सावर्डे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव प्रशिक्षण

2 Min Read
चिपळूण

८ चुलते, ७२ माणसे अन् ३५ वर्षांची परंपरा; दोणवली बामणेवाडीतील कदम कुटुंबीयांच्या सामूहिक गणेशोत्सवात तीन पिढ्यांचा संगम

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?