ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी

रत्नागिरीत हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
Last updated: September 20, 2026 9:42 am
Gramin Varta
34 Views
Share

रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजाराच्या मागील बाजूस पाण्याच्या टाकीजवळ पोलिसांनी कारवाई करून हेरॉईनसदृश अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ७ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ, त्याच्या पुड्या तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य आणि मोबाईल असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

शहर पोलिस परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शासकीय वाहनातून गस्त घालत असताना माळनाका, साळवी स्टॉप, नाचणे रोड, एसटी स्टँड परिसरात पेट्रोलिंग करण्यात आले. त्यानंतर आठवडा बाजार परिसरात गस्त घालत असताना पाण्याच्या टाकीजवळ संशयास्पद स्थितीत शिव कुमार चौधरी ऊर्फ शिव बहादुर सोनार (वय ३२, सध्या रा. पांढरा समुद्र, मुरुगवाडा, रत्नागिरी; मूळ रा. साडेपानी, जिल्हा कैलाली, नेपाळ) हा आढळून आला. त्याच्याकडे तपासणी केली असता पारदर्शक प्लास्टिक पिशवीत उग्र वासाचा ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ आढळून आला.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्लास्टिक पिशवीसह सुमारे ७ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ आढळला. त्यापासून २४२ पुड्या तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले असून, प्रत्येक पुडीची किंमत ५०० रुपये असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच अंमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरलेली भगव्या रंगाची प्लास्टिक पिशवी, पुड्या बांधण्यासाठी वापरलेले २४२ कागदाचे तुकडे आणि १५ हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित अशोक कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५९/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(अ), २१(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दुर्गा जीत बहादुर (वय ३१, मूळ रा. वॉर्ड क्रमांक ४, घोडाघोडी, कैलाली, नेपाळ; सध्या रा. पांढरा समुद्र, मुरुगवाडा, रत्नागिरी) याचाही आरोपी म्हणून समावेश आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोलीच्या मातीतल्या शुभम लोंढेची राष्ट्रीय स्तरावर धडक; पॉवरलिफ्टिंगमध्ये दुहेरी रौप्यपदक पटकावत उंचावला महाराष्ट्राचा झेंडा

Gramin Varta
2 Min Read

मालगुंड ग्रामपंचायतीत जयगड पोलिसांचा सायबर जनजागृती उपक्रम; ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत नागरिकांशी थेट संवाद

Gramin Varta
2 Min Read

लांजा पोलिसांच्या आवाहनाला कुवेतील सिद्धिविनायक मंडळाची साथ; ‘डीजेमुक्त गणेशोत्सवा’च्या संकल्पाबद्दल पोलिसांकडून गौरव

Gramin Varta
1 Min Read

परतीचा पाऊसही ठरणार तोकडा; धरणांतील साठा आणि करपलेल्या खरिपाला दिलासा मिळणे कठीण, राज्यात दुष्काळाचे सावट गडद

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत ७० वर्षीय महिला घरातून बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल

1 Min Read
रत्नागिरी

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात; कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल

1 Min Read
रत्नागिरी

हातखंबा तिठा-गाव मार्गावरील धोकादायक उतार ठरतोय अपघातांचा सापळा; गतिरोधकासह सुरक्षात्मक उपाययोजनांची मागणी

2 Min Read
रत्नागिरी

राजीवडा समुद्रात महाकाय लाटेच्या तडाख्याने नौका उलटली; आठ मच्छीमार बचावले

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?