ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत एफडीएकडून विविध अन्नपदार्थांचा साठा जप्त, ३२ नमुने संकलित
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत एफडीएकडून विविध अन्नपदार्थांचा साठा जप्त, ३२ नमुने संकलित
रत्नागिरी

रत्नागिरीत एफडीएकडून विविध अन्नपदार्थांचा साठा जप्त, ३२ नमुने संकलित

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 8:31 am
Gramin Varta
133 Views
Share

रत्नागिरी: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील अन्नपदार्थांचा साठा जप्त केला असून ३२ नमुने संकलित करण्यात आले आहेत.

नागरिकांना सुरक्षित, निर्भेळ व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत तसेच सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ, प्रतिबंधित रंगांचा वापर व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या रत्नागिरी विभागातर्फे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान मिठाई विक्रेते, खाद्यपदार्थ उत्पादक व विक्रेत्यांच्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संशयास्पद अन्नपदार्थ आढळून आल्याने नियमानुसार जप्तीची कारवाई करण्यात आली.

मोहिमेदरम्यान करण्यात आलेली प्रमुख कारवाई अशी – रत्नागिरी शहर : टर्कॉईज रंगाचा काजू रोल – ६ किलो, किंमत १०,३२०/-.

दापोली : म्हैसूर पाक – १० किलो व मलाई बर्फी – १३ किलो, एकूण किंमत ११,५२०/-.

रत्नागिरी शहर : खवा – १८ किलो व सुटे खाद्यतेल – १० किलो, एकूण किंमत ७,८८०/-.

रत्नागिरी ग्रामीण : शेवचिवडा – ५० किलो व मिश्रण फरसाण – ७० किलो, एकूण किंमत २५,२००/-.

बेसन – १०० किलो, ओम नमकीन फरसाण – ३० किलो व मैदा – १०० किलो, एकूण किंमत १९,३२०/-.

कोकम आगळ – २०४ लिटर, किंमत ५३,०४०/-.

नोंदविलेल्या सर्व सहा नोंदींची एकत्रित दर्शनी किंमत १,२७,२८० रुपये आहे.

संकलित अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून, प्राप्त होणाऱ्या विश्लेषण अहवालानुसार संबंधित अन्न व्यावसायिकांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थ तयार करताना व विक्री करताना स्वच्छता, गुणवत्ता व सुरक्षिततेच्या निकषांचे काटेकोर पालन करावे. मिठाई व इतर खाद्यपदार्थांमध्ये प्रतिबंधित कृत्रिम रंगांचा वापर करू नये. तसेच नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना त्यांची गुणवत्ता, उत्पादन तारीख व अंतिम वापर तारीख यांची खात्री करावी.

नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हे अन्न व औषध प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध यापुढेही विशेष तपासणी व कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार आहे.

Total Visitors :

5469262
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू; आंब्याचा हप्ता कमी होऊन संरक्षण कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला

Gramin Varta
3 Min Read

MPSC आंदोलनाला मोठे यश; तुकाराम मुंढे उच्चस्तरीय चौकशी समितीत; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरीत २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा होणार

Gramin Varta
2 Min Read

राजापुर: कोदवली धरण सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र;आठवडा बाजारावर सायंकाळी ७ चे बंधन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

केस कापायला जातो म्हणून घरातून निघालेला रत्नागिरीतील तरुण महिनाभरापासून बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

जाकादेवीत १४ नोव्हेंबरला हार्मोनियम, ढोलकी वादन प्रशिक्षण कार्यशाळा

1 Min Read
रत्नागिरी

आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर आंबवपोंक्षे शाळेच्या चिमुकल्यांचा ‘अनुभव हाच गुरु’ मधून प्रभावी कलाविष्कार

2 Min Read
रत्नागिरी

‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरी पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी धडक; १६ गुन्हे दाखल करत २२ जणांना ठोकल्या बेड्या

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?